Vinayak Damodhar Savarkar – स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.

Vinayak Damodhar Savarkar – स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.

Vinayak Damodhar Savarkar - स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.
स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.

 

Vinayak Damodhar Savarkarभारतीय स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्यलढ्या पैकी एक आहे. सुमारे पावणेदोनशे वर्ष हा संघर्ष जगाच्या इतिहासात एक वेगळे अस्तित्व निर्माण करून गेला. भारत देशावरील ब्रिटिशांची हुकूमशाही नष्ट करण्यासाठी असंख्य भारतीयांनी आजीवन संघर्ष केला.या लेखामध्ये आपण Vinayak Damodhar Savarkar – स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर यांचा संपूर्ण जीवन परिचय पाहणार आहोत.

यात लोकमान्य टिळक, यांच्यापासून ते महात्मा गांधी यांच्यापर्यंत असंख्य स्वातंत्र्यसेनानी होते. परंतु या सर्वांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodhar Savarkar) यांचे स्थान हे काही वेगळच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच देशांतर्गत असलेल्या प्रथांच्या निर्मूलनासाठी जो संघर्ष केला तू आजच्या या लेखातून आपण पाहणार आहोत.

थोडक्यात सावरकर :-Vinayak Damodhar Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodhar Savarkar) हे केवळ एक स्वातंत्र्य सेनानी नाही तर प्रख्यात कवी, उत्तम लेखक, थोर समाज सुधारक, उच्च विचारांचे तत्त्वज्ञ तसेच सुंदर राजकारणी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपली संपूर्ण हयात प्रखर हिंदूत्वाचे च्या पुरस्कारासाठी घातली. ते एक कट्टर हिंदू होते. त्याचबरोबर कट्टर हिंदुत्ववादा चे जनक ही होते.

नाशिक जिल्ह्यातील भगूर शहरात जन्मलेले सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीतील मोठं नाव असलेले बाबाराव सावरकर यांचे धाकटे बंधू होते. त्याचबरोबर नारायणराव सावरकर यांचे थोरले बंधू होते.

स्वातंत्र्य भावनेचे बीज :-

वयाच्या 13व्या वर्षीच त्यांच्यातील कवी लोकांनी पाहिला. स्वातंत्र्याचे स्तोत्र तसेच स्वदेशीचा फटका या त्यांच्या रचना, त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये खूप गाजल्या. नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. स्वातंत्र्य संग्राम मध्ये चाफेकर बंधूंना दिलेली फाशी सावरकरांना (Vinayak Damodhar Savarkar) विचलित करून गेली. या गोष्टीमुळे सावरकर यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा फुत्कार जागा झाला. आणि कुलदेवता भगवती समोर ” मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेऊन त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून दिले.

वैवाहिक जीवन :-

मार्च 1901 मध्ये ठाणे शहराजवळ असलेल्या जवाहर कसबे येथील भाऊराव त्र्यंबक चिपळूणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी सावरकरांचा विवाह झाला. यमुनाबाईंना सर्वजण माई या नावाने ओळखत. माई सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सतत पाठिंबा दिला.

सावरकरांच्या उच्च शिक्षण तसेच लंडनला पुढील शिक्षणासाठी संपूर्ण जबाबदारी माईंनी आपल्या वडिलांना घ्यायला लावला.

वीर सावरकरांना चार अपत्ये होती. दुर्दैवाने सावरकर (Vinayak Damodhar Savarkar) लंडनमध्ये असताना त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. त्याचबरोबर सततच्या आजारपणामुळे त्यांची शालिनी नावाची दुसरी मुलगी सुद्धा अचानक मरण पावली. 1928 मध्ये त्यांना आणखी एक मुलगा झाला. पुढे 1963 साली मुंबई मध्ये यमुनाबाई तथा माई सावरकर यांचा सुद्धा देहान्त झाला.

सावरकरांचे (Vinayak Damodhar Savarkar) क्रांतिकार्य आणि शिक्षण :-

लग्नानंतर पुढच्याच वर्षी म्हणजेच 1902 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणाचे चार वर्षे पूर्ण करून; पुढील शिक्षणासाठी ते लंडनला निघून गेले. सावरकर यांनी आपल्या संपूर्ण क्रांति कार्यामध्ये, जगाच्या इतिहासाला नोंद घ्यावी लागेल असेच कार्य केले आहे.

सुरुवातीला आपल्या म्हसकर व पागे या कारण सोबत मिळून “राष्ट्रभक्तसमूह” या गुप्त संघटनेची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्य क्रांती उच्च टोकाला नेण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलं. सावरकरांची बहुचर्चित “मित्रमेळा” ही संघटना राष्ट्रभक्तसमूह या संघटनेची जग जाहीर असलेली उपशाखा होती. हीच संघटना पुढे “अभिनव भारत” या नावाने ओळखली जाऊ लागली.

लोकमान्य टिळकांच्या शिफारशीवरून थोर क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिक्षणासाठी ठेवलेली शिष्यवृत्ती सावरकरांना (Vinayak Damodhar Savarkar) देण्यात आली. व आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी लंडन गाठले. सुरुवातीपासूनच त्यांचा सशस्त्र क्रांती वर श्रद्धा होती. त्यांनी लंडन मध्ये जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र मराठीतून भाषांतरित केलं. यातच त्यांनी सशत्र क्रांतीचे महत्व सर्वांसमोर मांडले होते. त्याकाळातील युवकांवर सावरकरांच्या विचाराचा प्रभाव होता.

सशस्त्र क्रांतीचा श्रीगणेशा :-

सावरकरांच्या एका शब्दावर हजारो क्रांतिकारक प्राणाची आहुती द्यायला तयार होत. सशस्त्र क्रांतीचा पहिला मुहूर्त सावरकरांचे शिष्य मदनलाल धिंग्रा यांनी आरंभिला. इंग्लंड मध्ये शिक्षण सुरु असताना मदनलाल धिंग्रा यांनी विलियम हट कर्झन वायली या अधिकाऱ्याचा वध करून सशत्र क्रांतीचा आरंभ केला. त्याचवेळी सावरकरांनी आपल्या सहकाऱ्यांना बॉम्ब बनवायचे प्रशिक्षण घेण्यास मदत केली.

बाबाराव सावरकर यांच्या अटकेला कारणीभूत ठरलेल्या जॅक्सन या अधिकाऱ्याचा वध झाला त्याकामी लागणारे पिस्तुल हे वीर सावरकर आणि सहकाऱ्यांच्या मदतीनेच भारतात आले होते. १८५७ चे स्वातंत्र्य समर हा शासन द्रोह आहे. असं इंग्रज जगभर सांगत होते. पण ते किती खोटं आहे हे सावरकरांनी जगाला पटवून दिले.

अनंत यातना सहन करून वीर सावरकरांनी इंग्रजांनी दिलेली काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. शिक्षेच्या काळात त्यांनी भारताच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवलं.

भारताची फाळणी आणि मुस्लीम लीग चा वाढता प्रभाव या गोष्टींनी सावरकर विचलित होत. त्यांच्या आतील हिंदुत्व त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी तुरुंगात असतानाच “हिंदुत्वाचे पंचप्राण” हा ग्रंथ लिहिला होता.

सावरकरांची बदनामी :-

अनेक वर्षे चाललेला स्वातंत्र्यलढा हा जवळपास अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला होता. ब्रिटिशांनी दोन धर्मांमध्ये उभी फुट पाडली होती. जातीय सलोखा पूर्णतः बिघडून चालला होता. अशातच मुस्लिम लीग स्वतंत्र देशाची मागणी करत होती. इंग्रजांपेक्षा मुस्लिमांनाच स्वतंत्र राष्ट्र हवे होते. त्यासाठी ते पाकिस्तान या देशाची मागणी करू लागले.

शेवटच्या काळात अशी परिस्थिती येऊन ठेपली, कि इंग्रजांना मुख्य शत्रू मानणे चुकीचे झाले. कारण आज ना उद्या इंग्रज देश सोडणारच होते. परंतु हिंदूंची एकता, प्रखर हिंदुत्व धोक्यात आले होते. वीर सावरकरांना तुरुंगात राहून हे कार्य करणे अवघड होते. त्याचमुळे रंगस्वामी अय्यंगार, वल्लभ भाई पटेल यांच्यासारख्या मुत्सुद्दी नेत्यांनी प्रयत्न केले व इंग्रज सरकारच्या काही नियम व अटी मान्य करून सरकारची माफी मागितली.

परिणामी 6 जानेवारी 1924 रोजी इंग्रज सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका केली. परंतु सावरकरांचा मुत्सद्दीपणा त्यांचा विरोध करणाऱ्यांना पटला नाही. व अनेक ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर सावरकर असे टोमणे दिले गेले. यातून सावरकरांची वेळोवेळी बदनामी केली गेली.

जातीयवादाला सावरकरांचा विरोध :-

अंदमानातून झाल्यानंतर सावरकरांनी सर्वप्रथम देशातील जातीय वाद नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे विरोधक होते. भारतातील सामाजिक फुट की जाती वादामुळे निर्माण झाली आहे. जातिवाद ही वर्ण व्यवस्थेची देन आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून नोव्हेंबर 1930 पासून त्यांनी सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन रोटीबेटी व्यवहार याचं महत्त्व पटवून दिलं.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी भोजनालये सुरु केली. ज्यामध्ये सर्व जातीतील लोकांना सोबत जेवणाची सोय होती. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिराची स्थापना करून प्रत्येक जातीतील या ठिकाणी येतील, व त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण होईल याची सोय केली. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या हाताने जवळपास 15 आंतरजातीय जोडप्यांचे विवाह लावून दिले.

हिंदू महासभा :-

1937 पासून ते 1944 पर्यंत सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. अनेक महत्त्वाचे निर्णय, त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्व हिंदूंची वज्रमूठ बांधण्यावर त्यांनी जोर दिला. आधुनिक विचारधारा नुसार व आधुनिक विज्ञानानुसार हिंदूनी आपली विचारधारा बदलावी असा त्यांचा कायम आग्रह होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Vinayak Damodhar Savarkar) ज्वलंत हिंदुत्व आणि संपूर्ण देश प्रभावित झाला होता. लेखक, कवी, राजकारणी, समाज सुधारक अशा प्रत्येक रूपामध्ये सावरकरांनी संपूर्ण देश ढवळून काढला. या संपूर्ण काळात हिंदू महासभेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य लढा अधिक प्रभावी केला.

महाप्रयाण :-

आपल्या आयुष्याची जवळपास साठ वर्षे त्यांनी समाज व देश कार्यासाठी खर्ची घातली. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी हिंदू पुराणातील प्रयाण संकल्पनेप्रमाणे त्यांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या नियमानुसार त्यांनी अन्नपाण्याचा तसेच औषधांचा सुद्धा त्याग केला. 1 फेब्रुवारी 1966 त्यांनी व्रत धारण केले. ते सुमारे 26 दिवस व्रतस्थ होते.

आणि दिनांक 26 फेब्रुवारी 1966 रोजी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक धगधगता निखारा शांत झाला. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर (Vinayak Damodhar Savarkar) हे अनंतात विलीन झाले.

Vinayak Damodhar Savarkar - स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.
Vinayak Damodhar Savarkar – स्वातंत्र्यवीर वी.दा.सावरकर संपूर्ण जीवन परिचय.
 1. सावरकरांची ग्रंथसंपदा :-
 2. १८५७ चे स्वातंत्र्यसमर.
 3. अंधश्रद्धा. ( भाग एक व दोन).
 4. ऐतिहासिक निवेदने.
 5. काळेपाणी.
 6. क्रांतिघोष.
 7. गांधी आणि गोंधळ.
 8. जात्युच्छेदक निबंध.
 9. तेजस्वी तारे.
 10. जोसेफ मॅझिनी.
 11. प्राचीन अर्वाचीन महिला.
 12. महाकाव्य कमला.
 13. संगीत उत्तरक्रिया.
 14. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने.
 15. माझ्या आठवणी ( पूर्वपीठिका, नाशिक, भगूर ).
 16. मोपल्यांचे बंड.
 17. रणसिंग.
 18. शत्रूच्या शिबिरात.
 19. संन्यस्त खड्ग.
 20. बोधिवृक्ष.
 21. हिंदुत्वाचे पंचप्राण.
 22. क्ष-किरणे.
 23. सावरकरांची पत्रे.
 24. लंडनची बातमीपत्रे.
 25. माझी जन्मठेप ( आत्मचरित्र )

वीर सावरकरांची संपूर्ण पुस्तके

खरेदी तसेच घरपोहोच मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा.

इत्यादी. व अशीच इतरही पुस्तके सावरकरांनी (Vinayak Damodhar Savarkar) लिहिले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodhar Savarkar) यांचे संपूर्ण जीवन चरित्र हे देश भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. सावरकरांचे जीवन, व त्यांच्या जीवन कार्याविषयी दिलेली ही संक्षिप्त माहिती आपणास कशी वाटली मला कमेंट द्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!