Titanic and Titan Submarine – टायटॅनिक जहाज व टायटन पाणबुडी योगायोग

Titanic and Titan Submarine-टायटॅनिक जहाज व टायटन पाणबुडी योगायोग

Titanic and Titan Submarine-टायटॅनिक जहाज व टायटन पाणबुडी योगायोग

 

Titanic and Titan Submarine-कधीही न बुडणारे जहाज. अशी दमदार जाहिरात केलेलं आर एम एस टायटॅनिक 10 एप्रिल 1912 रोजी प्रवासाला निघालं. साउथम्पटन इंग्लंड येथून सुरु झालेला प्रवास हा न्यूयार्क शहरांमध्ये संपणार होता. अतिशय विशालकाय आणि सर्व सुख सुविधांनी युक्त असलेले टायटॅनिक आपला प्रवास करत होतं.  यांच्यातील विलाक्षण योगायोग पाणबुडी आणि जहाज पण इथे पाहणार आहोत.

सुमारे सव्वा दोन हजार प्रवाशांना सोबत घेऊन टायटॅनिकचा प्रवास सुरू झाला. जगातल्या कधीही न बुडणाऱ्या जहाजाच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी जगातल्या विविध देशातील हौशी लोकांनी त्यातून प्रवास करण्याची आपली हौस पूर्ण करायचं ठरवलं.

परंतु आपल्या प्रवासाच्या चौथ्याच दिवशी म्हणजेच १४  एप्रिल १९१२ रोजी एका भल्या मोठ्या हिमनगाचा सोबत टक्कर होऊन  टायटॅनिक दुर्दैवाने जवळपास दोन हजार दोनशे सत्तावीस(२२२७ ) प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन अटलांटिक महासागराच्या तळाला जाऊन पोहोचलं.

या लेखात Titanic ship and Titan Submarine coincidence – टायटॅनिक जहाज आणि टायटन पाणबुडी मधील योगायोग यांचा उहापोह केलेला आहे.

टायटन पाणबुडी आणि टायटॅनिक जहाज :-

 टायटॅनिक जहाज आणि टायटन पाणबुडी Titanic and Titan Submarine मधील योगायोग हा कमालीचा आहे.

या जहाजाच्या त्या आठवणी ताज्या होण्याचं कारणही तसच आहे. काही दिवसांपूर्वी याच बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी, काही हौशी पर्यटक समुद्राच्या तळाशी निघाले होते. ओशन गेट या समुद्र पर्यटन कंपनीमार्फत टायटन नावाची पाणबुडी गेल्या 18 तारखेला टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी निघाली.

पाकिस्तानी उद्योगपती शहजादा दाऊद, त्याचा मुलगा सुलेमान दाऊद व ब्रिटिश उद्योजक आणि समुद्र अभ्यासक हामिश हर्डीक व अन्य दोघे जण अशा पाच जणांना घेऊन टायटल नावाची पानबुडी निघाली होती.

सुमारे दोन तासापर्यंत या पाणबुडीचा व्यवस्थापनाशी व्यवस्थित संपर्क होता. नंतर मात्र अचानक संपर्क तुटला. आणि पाहता पाहता टायटन ही पाणबुडी समुद्रातच बेपत्ता झाली. या दुःखद घटनेने, 100 वर्षांपेक्षाही जास्त काळ झालेल्या व आजही लोकांच्या विस्मरणात न गेलेल्या टायटॅनिक जहाजाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

टायटॅनिक अपघात आणि शेकडो मृत्यूचे कारण :-

14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक बुडाले. आत्तापर्यंत संपूर्ण जगामध्ये झालेल्या समुद्र अपघातांमध्ये हा सर्वात विनाशकारी अपघात आहे. जवळ जवळ पंधराशे 17 लोक या अपघातामध्ये जीवानिशी गेले होते.

हे ही वाचा 

कधीही न बुडणारे जहाज अशी ख्याती असलेलं टायटॅनिक बुडाले कसे व त्यातील इतक्या प्रवाशांना आपला जीव का गमवावा लागला. याची ठळकपणे दोन करणे सांगता येतील.अपघात मग तो कोणताही असो जाणून बुजून केलेला नसतो.

काळोख्या अंधारात भल्यामोठ्या हिमनगासोबत झालेल्या टकरी मुळे हा महाभयंकर अपघात घडला. आणि कधीही न बुडणारे जहाज आपल्या पहिल्याच प्रवासामध्ये, सुमारे दीड हजारापेक्षा जास्त लोकांना आल्यासोबत घेऊन कायमच गेलं. Titanic and Titan Submarine हे भविष्यात रक गूढ समजल्या जाईल.

इतक्या लोकांच्या मृत्यू होण्याच्या वर उल्लेख केलेल्या दोन कारणांमध्ये; प्रवासी जहाजामध्ये आवश्यक असणाऱ्या जीवरक्षक यंत्रणेमध्ये फक्त ११७८ इतक्याच प्रवाश्यांना आपत्कालीन परिस्थिती मध्ये वाचवता येईल इतक्याच नावा उपलब्ध होत्या. हि संख्या एकूण प्रवाश्यांच्या निम्मीच होती.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायटॅनिक मधून प्रवास करणाऱ्या कित्येक लोकांनी जहाज बुडत आहे हि गोष्ट गांभीर्याने घेतलीच नाही. किंवा त्यांना घटनेचे गांभीर्य कळलेलेच नव्हते असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

आणखी एक गोष्ट अशी म्हणता येईल कि टायटॅनिकच्या कर्मचाऱ्यांनी हि विशिष्ट लोकांनाच वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं. खास करून लहान मुले तसेच स्त्रियांना आधी बाहेर काढून सुरक्षित करण्यावर दिलेला भर.

याने एक गोष्ट झाली, ती म्हणजे अशी कि बऱ्याच जीवरक्षक नावा या क्षमता असूनही खूप कमी लोकांना घेऊन गेल्या. आणि शेवटी २२२७ लोकांपैकी फक्त आणि फक्त ७०६ इतकेच लोक जीवन्त राहिले बाकी सार्वजन टायटॅनिक सोबतच इतिहास जमा झाले.

जास्त मृत्य का झाले ?

-2 (उणे दोन) अंश सेल्सियस इतक्या तापमानात माणूस १५ मिनिटांच्या आत मारू शकतो. एवढंच तापमान टायटॅनिक बुडाले तेंव्हा समुद्रात होतं.

निर्मिती :-

त्या काळात उपलब्ध असलेलं आधुनिक तंत्रज्ञान वापरून अनेक अनुभवी इंजिनियर्स टायटॅनिक बनवण्यासाठी झटले होते. अनेक अद्ययावत सामग्रीचा वापर करून असंख्य सुरक्षा साधनाचा वापर याच्या निर्मितीसाठी केला गेला होता. तरीही टायटॅनिक प्रवासी तसेच निर्मात्यांच्या विश्वासाला खरे उतरले नाही.

टायटॅनिकचा प्रवास कसा सुरु झाला? :-

इंग्लंड मधील साउथॅम्पटन मधून टायटॅनिकने १० एप्रिल १९१२ रोजी प्रवासाला सुरुवात केली. इथेच त्याला पहिला अपशकून झाला होता. टायटॅनिक प्रवासाला निघाले तेंव्हा त्याच्या जवळ एस. एस.न्यूयार्क हे जहाज उभे होते. टायटॅनिकच्या जोराच्या हिसक्याने याचा दोर तुटला व ते टायटॅनिकला धडकणार होते.

परंतु, एका टग बोटीच्या मदतीने त्याला केवळ 4 मीटर अंतर असताना त्याची दिशा बदलण्यात यश आलं. त्यानंतर सुद्धा टायटॅनिकला दोन जागी थांबवावं लागलं होतं. सरते शेवटी प्रथम वर्गात ३२९ प्रवासी, द्वितीय वर्गात २८५ प्रवाशी, व तृतीय वर्गात ७१० प्रवासी व आपले काही कर्मचारी अशा एकूण २२४० लोकांना सोबत घेऊन टायटॅनिकने आपला प्रवास सुरु केला.

ही घटना खरोखर एखाद्या सिनेमाला शोभावी अशी आहे म्हणूनच टायटॅनिकवर आजपर्यंत अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. व लोकांच्या उत्सुकतेने ते अफाट लोकप्रिय सुद्धा झाले आहेत.

योगायोग :-

1) टायटॅनिकच्या प्रवाश्यांमध्ये काही नवविवाहित जोडपे होते जे हनिमून साठी निघालेले होते.

2) जॉन जेकब अस्तर हे त्या काळातील जगातील सर्वात श्रीमंत दाम्पत्य टायटॅनिक मध्ये होते.

३) जेवढी जहाजाची प्रवाशी क्षमता होती त्यापेक्षा खूपच कमी लोक जहाजामध्ये भरले होते.

4) न्याशनल कोल चा संप असल्यामुळे अनेक लोकांनी आपले आरक्षण रहित केले होते.

5) टायटॅनिकच्या मालकाने अर्थात जे.पी. मॉर्गन याने आगदी शेवटच्या मिनिटाला स्वतःचे आरक्षण रहित केले होते.

टायटॅनिक चा शेवट कसा झाला?

ज्या वेळी टायटॅनिकचा प्रवास सुरु झाला, तेंव्हा वेळोवेळी त्याला मार्गात असणाऱ्या हिमनगा विषयी माहिती मिळत होती. १४ एप्रिल रोजी सुद्धा दुपारी पावणे चार वाजता पुढे मार्गात हिमनग असल्याचा संदेश मिळाला होता.परंतु या संदेशाला कर्मचाऱ्यांनी जास्त गांभीर्याने घेतलेच नाही.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

शेवटच्या क्षणाला आलेल्या संदेशावरून जहाजाची दिशा बदलण्याचे व हिमनागासोबत होणारी टक्कर टाळण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. सरळ होणारी टक्कर टाळण्यात यश आले. परंतु टायटॅनिक च्या उजव्याबाजूला पाण्याखाली २० फुट खोल असणारा भाग हा हिमनगावर आदळला.

या धडकेत जहाजाला चिरा पडल्या आणि याच भेगांमधून आत मध्ये पाणी शिरू लागले. सुरुवातीला तळ माजले भरत गेले व जहाजाचा मागील भाग पाण्याखाली बुडाला. त्याच प्रमाणे हळूहळू करत संपूर्ण टायटॅनिक पाण्याखाली गेले.

आणि अशा प्रकारे संपूर्ण जगभरात कधीही न बुडणारे जहाज म्हणून ज्याचा प्रचार केला गेला होता, ते टायटॅनिक जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात कित्येक जीवांना घेऊन समुद्राच्या तळाशी कायमचं विसावलं.

थोडक्यात :-

आज घडीला  टायटॅनिक जहाज आणि टायटन पाणबुडी Titanic and Titan Submarine मधील योगायोग हा खरंच विचार करायला लावणारा आहे.

हेच टायटॅनिक आजही जगभरातील असंख्य लोकांच्या कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय आहे. कधीही न बुडणारे जहाज जरी बुडाले असले,तरी लोकांच्या मनातून मात्र ते कधीही बुडणार नाही. कारण टायटॅनिक हे कधीही न संपणारे पर्व आहे.

कोट्यवधी लोकांच्या मनात शंभर वर्षांहून अधिक काळ आणि पुढील कित्येक शतके तरंगत राहणाऱ्या टायटॅनिक च्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

विशाल टायटॅनिक जहाज आणि आणि असच नाव असणारी टायटन हि पाणबुडी Titanic and Titan Submarine. काय योगायोग असेल टायटॅनिक पाहायला गेलेली टायटन सुद्धा त्याच मार्गाने गेली.

Leave a Comment

error: Content is protected !!