Subhedaar movie- सुभेदार चित्रपट कसा असेल? प्रदर्शित कधी होईल?

 

Subhedaar movie - सुभेदार चित्रपट कसा असेल? प्रदर्शित कधी होईल?
Subhedaar movie – सुभेदार चित्रपट कसा असेल? प्रदर्शित कधी होईल?

Subhedaar movie – सुभेदार चित्रपट कसा असेल? प्रदर्शित कधी होईल?

Subhedaar Movie– दिग्पाल लांजेकर यांनी नुकतीच आपल्या नवीन मराठी चित्रपटाची घोषणा केली.’ सुभेदार…काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा. असे भारदस्त नाव असलेला हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. अर्थातच Subhedaar  हा चित्रपट सुद्धा ऐतिहासिक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर वाहिलेल्या शिवराज अष्टक या शृंखलेतील हा पाचवा हिंदी चित्रपट.

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शक असलेल्या दिग्पाल लांजेकर यांनी आज पर्यंत बऱ्याच चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केलेले आहे. यामध्ये ऐतिहासिक आणि प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटांची एक साखळीच लांजेकर यांनी निर्माण केली.

शिवप्रेमी चित्रपट निर्माते  :-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उज्वल प्रेरणादायक इतिहासाला मोठ्या पडद्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचं काम लांजेकर यांच्या चित्रपटांनी केलं. जुन्या काळी भालजी पेंढारकर यांच्यासारखे शिवप्रेमी निर्माते-दिग्दर्शक शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट बनवून महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणत.

त्यातच आधुनिक काळातील तंत्रज्ञान तसेच इतिहास शुद्ध अशा प्रकारचे साधन यांचा वापर करून तेजोमय शिव इतिहास आधुनिक समाजाला पचेल आणि रुचेल त्याच बरोबर प्रेरणादायक ठरेल या उद्देशाने लांजेकर यांची शिवराज अष्टक ही शृंखला खरोखरच महत्वपूर्ण आहे.

नुकतीच दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केले आहे. हा चित्रपट Subhedaar movie सुभेदार या नावाने प्रदर्शित होईल. आणि अर्थातच हा चित्रपट सुभेदार नरवीर मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असेल.

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित यापूर्वीच एक हिंदी मध्ये येऊन गेला. अजय देवगन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होता. दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट इतिहास शुद्ध नव्हता अशी असंख्य लोकांची तक्रार आहे.

आणि म्हणूनच आत्ता येत असलेल्या Subhedaar movie सुभेदार या चित्रपटा पासून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि स्वराज्यावर प्रेम करणाऱ्या तसेच मराठी अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला सुभेदार आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

दिग्पाल लांजेकर :-

दिगपाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, तसेच शेर शिवराज या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. कलाकारांचा उत्तम अभिनय त्याचबरोबर उत्कृष्ट संवाद लेखन तसेच दिग्पाल लांजेकर याचं उत्तम दिग्दर्शन या साऱ्याच गोष्टींनी शिवराज अष्टक मालिकेतील सर्वच चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर गेले आहेत.

दिग्पाल लांजेकर यांनी यापूर्वीच शिवराज अष्टक या मालिकेत स्वारी आग्रा हा पुढचा चित्रपट असेल अशी घोषणा केली होती. हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर व सागर यातून सुटकेचा थरार दाखवणारा असेल असं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या नवीन घोषणेनुसार येणारा चित्रपट हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित असेल.Subhedaar movie.

निर्माते व दिग्दर्शकांनी अचानक निर्णय का घेतला हे समजायला मार्ग नाही. शिवरायांची आग्रा भेट हा इतिहासातील एक धगधगता प्रसंग आहे. म्हणून स्वारी आग्रा या चित्रपटाची लोकांना प्रतीक्षा होती. परंतु लांजेकर यांनी तो चित्रपट काही कारणास्तव मागे ठेवला आहे. सुभेदार Subhedaar movie हा ऐतिहासिक चित्रपट लांजेकर यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे महाराजांचा अभिमान व मराठी अस्मिता जपणारा असेल शंका नाही.

अधिकृत ट्रेलर पाहण्यासठी येथे क्लिक करा.

 

काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागथा…..सुभेदार. Subhedaar movie.

असं दमदार नाव दिग्दर्शकांनी घोषित केलं आहे. नावावरूनच आपल्या लक्षात येतं कि हा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर असेल. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारून स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या या नरवीराची जीवन गाथा प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे. कोंढाणा किल्ल्याचा सिंहगड होण्यासाठी झालेला थरार या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे.

सुभेदार मालुसरे यांची उदयभान सोबतची झुंज, स्वराज्यासाठी घेतलेली अपार मेहनत, छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं अतोनात प्रेम, त्याच बरोबर एकीकडे शिव स्वराज्य निर्मिती व दुसरीकडे पुढच्या मुलाचं लग्न या द्विधा मनस्थिती मध्ये पडलेल्या मालुसरे यांचं भावविश्व या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल.

हिरोजी फर्जंद, सरसेनापती हंबीरराव मोहिते, यांच्या सारख्या कट्टर मावळ्यांच्या जीवन चरित्राने मराठी मनाला सतत भुरळ घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन पैलू उलगडणारे चित्रपट रसिक प्रेक्षक डोक्यावर घेतातच. याच संदर्भातली एक पर्वणी म्हणजे सुभेदार हा चित्रपट Subhedaar movie आहे.

तान्हाजी द अनसंग वारियर :-

अजय देवगण, काजोल, शरद केळकर,सैफ आली खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार सोबत घेऊन दिग्दर्शक ओम राउत यांनी दिग्दर्शित केलेला तान्हाजी द अनसंग वारियर हा चित्रपट बऱ्यापैकी गाजला. परंतु तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर आणि इतिहासाला धरून नसलेले कथानक यामुळे असंख्य चित्रपट प्रेमी नाराज होते. यातच नव्याने येत असलेला सुभेदार चित्रपट एक आनंदाची पर्वणी घेऊन येत आहे.

हिंदीतील तान्हाजी आणि आता येत असलेला सुभेदार हे दोन्ही चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडवणारे आहेत, परंतु दिग्पाल लांजेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शन पाहता सुभेदार चित्रपट सरस ठरेल यात शंका नाही.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि ए ए फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित होत असलेल्या या चित्रपटाचं केवळ दिग्दर्शनच नाही तर लेखन सुद्धा दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.

थोडक्यात :-

चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर, अनील वरखडे, प्रद्युत पेंढारकर, श्रुती दौंड, विनोद जावळकर तसेच अनिकेत जावळकर हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर यासारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटाला अधिकच रोमहर्षक बनवलं आहे.

छत्रपती शिवराय आणि स्वराज्याचे शिलेदार असलेल्या मावळे यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जन या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. क्षणाक्षणाला रोमांचित, आश्चर्यचकित, आनंदित व भावनिक करणारा चित्रपट प्रत्येकाने चित्रपट गृहात जाऊन नक्कीच पहावा असा असणार आहे.

अशाच महत्वाच्या मनोरंजन आणि जागतिक घडामोडी वर लक्ष ठेवण्यासठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट करून सांगा आपल्या सूचनांचं स्वागत आहे.

 

.

 

Leave a Comment

error: Content is protected !!