Space station – अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची प्राथमिक माहिती.

Sace station – अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची प्राथमिक माहिती.

 Space station information - अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची प्राथमिक माहिती.

Space station जसा जसा विज्ञानाचा विकास होत गेला, तसतशा मानवी ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या. आणि आज मानव ब्रह्माण्डाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याची तयारी करू लागला.

ब्रह्मांड आणि प्रमाणात अस्तित्वात असलेले ग्रहतारे; हे मानवी बुद्धीला सततच खुणावत आलेले आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन(International space station) अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा विज्ञानाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पृथ्वीपासून दूर, वातावरणाच्या बाहेर, अंतराळामध्ये राहून ब्रह्मांडाच्या व्याप्तीचे गुड उलगडण्याचा प्रयत्न करण्यासाठी मानव निर्मित प्रयोगशाळा म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक याकडे पाहता येईल.

स्थापना :-

आज आपण अंतराळाच्या संशोधनामध्ये महत्वाची भूमिका असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ( International space station) याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. अंतराळ मधून पृथ्वीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इतर ग्रह व तारे यांच्या संबंधी संशोधन करण्यासाठी संपूर्ण जगातील जवळपास यांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापना केली आहे.

इसवी सन 1998 मध्ये सुरू केलेले हे स्थानक आज पर्यंत पूर्णतः कार्यान्वित आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सर्वात पुढारलेल्या महत्त्वाच्या देशांनी या निर्मितीसाठी पुढाकार घेतला. यात रशिया, अमेरिका, जपान, कॅनडा यासारख्या सोळा देशांचा समावेश आहे.

विस्तार :-

आत्तापर्यंतच्या वैज्ञानिक प्रयोगामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन( International space station information) हा खूप मोठा शोध आहे. सध्या अस्तित्वात असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे एका फुटबॉलच्या मैदानात पेक्षा सुद्धा विशाल आहे.

आर. ओ. एस. अर्थात रशियन ऑर्बिटल सेगमेंट; तसेच यु. एस. ओ. अर्थात युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट आशा दोन भागात विभागलेला या स्थानकाची लांबी व रुंदी क्रमशः 240 व 236 फूट अशी आहे. नोव्हेंबर 2000 पासून आज पर्यंत तब्बल बावीस वर्षे 245 दिवस इतका कालावधी अनेक अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर वास्तविक केलेले आहे. त्याचबरोबर वेगवेगळे प्रयोग करून ब्रह्मांडात संबंधी शोध लावलेले आहेत.

कार्यकाळ :-

1998 सालापासून म्हणजेच त्याच्या निर्मितीपासून आज पर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International space station information) कार्यरत आहे. अधिक स्पष्ट सांगायचं झालं, तर नवनवीन सुधारणा केल्या पासून; म्हणजेच 2 नोव्हेंबर 2000 सालापासून आत्तापर्यंत हे अंतराळ स्थानक कार्यरत आहे. त्याचबरोबर सहभागी देशांचा आर्थिक वाटा हा 2024 पर्यंत राहील. आणि सध्याच्या करारानुसार 2028 सालापर्यंत हे स्थानक सक्रिय राहील असा अंदाज संशोधक लावत आहेत.

कार्यपद्धती :-

इंटरनॅशनल स्पेस स्टेश (International space station information) पृथ्वीपासून जवळपास साडेतीनशे किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवर आहे. 370 किलोमीटर एवढ्या उंचीवर ते असावं असा अंदाज आहे. 7.66 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीचे परिभ्रमण करत आहे. हा वेग सरासरी 27 हजार 724 किलोमीटर प्रतितास इतका प्रचंड होतो.

या वेगाने या स्पेस स्टेशन ला पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ 91 मिनिटे इतकाच वेळ लागतो. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक एक प्रकारचा कृत्रिम उपग्रह आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व कृत्रिम उपग्रह पेक्षा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे विस्तारित आणि मोठे आहे.

अभ्यास आणि प्रयोग :-

या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये रसायन शास्त्र, जीवशास्त्र, हवामानशास्त्र तसेच खगोलशास्त्र यांच्यासंबंधी प्रयोग प्रामुख्याने केले जातात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे काही प्रयोगांना येणाऱ्या अडचणी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मुळे 90 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहेत.

पृथ्वीवासी यांची महत्त्वाकांक्षी मोहीम समजल्या जाणाऱ्या मंगळ मोहिमेचे संबंधी महत्वाचे शोध या अंतराळ स्थानकामध्ये केले जात आहेत. वजन रहित माणूस अंतरिक्ष मध्ये किती दिवस वास्तव्य करू शकतो यासंबंधीचा अभ्यास हे याच ठिकाणी केला जातो. तसेच विविध शास्त्रज्ञांना दर सहा महिन्यांनी अंतराळामध्ये याच स्पेस स्टेशन वरती पाठवले जाते. व एकमेकांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग केले जातात.

आवश्यक असणारी ऊर्जा कुठून मिळते :-

स्पेस स्टेशन च्या दोन्ही बाजूला विस्तारित स्वरूपाच्या पंखाच्या आकृतीमध्ये सौर सेल अर्थात सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहेत. हे सोलर पॅनल सूर्यापासून ऊर्जानिर्मिती करतात. त्यातील एक भाग हा प्रत्यक्ष सूर्य किरणांपासून; तर दुसरा भाग हा पृथ्वीवरून परावर्तित होत असलेल्या सूर्य प्रकाशापासून ऊर्जा निर्मिती करतो.

ही ऊर्जा रशियन विभागाने निर्मित केलेल्या 28 होल्ड एसी सोलर पॅनल मध्ये साठवले जाते. तसेच अमेरिकन विभागाच्या 120-180 होल्ट डीसी क्षमतेच्या सोलर पॅनल मध्ये साठवले जाते. सदरील सोलर पॅनल हे पंखांच्या स्वरूपात दोन्ही बाजूला दोन दोन अशाप्रकारे चार जोड्यांमध्ये बसवले गेले आहेत.

अंतराळातील प्रत्येक संशोधनासाठी आवश्यक असणारी ऊर्जा सुखी सोलर पॅनल च्या साह्याने सूर्यापासून मिळवली जाते.

परिभ्रमण कक्षा :-

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International space station information) हे 330 किलोमीटर कमीत कमी आणि 410 किलोमीटर जास्तीत जास्त समुद्रसपाटीपासून उंच पृथ्वी परिभ्रमण करते. पृथ्वीवरील विषुववृत्ताच्या 51.6 अंश या कक्षेत परिभ्रमण कक्षा निश्चित केले आहे. या कक्ष मधून सरासरी 27 हजार 724 इतक्या प्रचंड वेगाने जवळपास साडे पंधरा पृथ्वी प्रदक्षिणा एका दिवसात पूर्ण करते. इतर अंतराळ यानांच्या सहाय्याने या स्पेस स्टेशनची उंची तसेच कक्षा यामध्ये बदल करता येतो.

थोडक्यात :-

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या सहाय्याने आतापर्यंत विविध प्रकारचे शोध लावण्या त्यांना यश आलं आहे. ब्रह्मांडाचे अनेक रहस्य उलगडणे मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन चा महत्त्वाचा वाटा आहे. अंतराळा मधून पृथ्वीकडे येणारे अनेक संकटे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामुळे आधीच ओळखता आले. व यावर वेळीच उपाय योजना करता आल्या. या अंतराळ स्थानकाचे महत्व पृथ्वीसाठी दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकूणच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक प्रकारे पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळ संशोधनाचे महत्त्वाचे साधन आहे. याशिवाय अंतरिक्ष मध्ये राहुन प्रयोग करणे हे अशक्य होते. आतापर्यंत अनेक वैज्ञानिक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये यशस्वी प्रयोग करून पृथ्वीवर परतले आहेत. परंतु अंतराळामध्ये राहुन संशोधन करणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.

आतापर्यंत इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International space station information मध्ये बऱ्याचदा भयंकर अपघात होता होता राहिले आहेत. वैज्ञानिकांच्या जीवाला धोका होईल अशाही परिस्थितीत निर्माण झाले आहेत. परंतु तरीही असंख्य वैज्ञानिक या स्पेस स्टेशनवर विविध प्रयोगासाठी जातातच. स्पेस स्टेशनची सुरक्षितता ही बऱ्याच वेळा पृथ्वीवरून कंट्रोल केली जाते.

इतर उपग्रहाच्या माध्यमातून स्पेस स्टेशनच्या दिशेने येणारा संभाव्य धोका रडारच्या किंवा इतर माध्यमातून हेरला जातो. व रेडिओ संभाषणाच्या माध्यमातून स्पेस स्टेशन मधील अंतराळवीरांना सुचित केले जाते. अशाप्रकारे ते आपल्या जीविताचे रक्षण करु शकतात.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा विज्ञानाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

अधिक आणि विस्तारित

माहितीसाठी येथे क्लिक करा.

अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकासंबंधी प्राथमिक माहिती आपण पहिली. त्याची रचना तसेच कार्य आपण पहिले. त्याची स्थापना, आकार, आवश्यक असणारा उर्जा स्त्रोत इत्यादी संबंधी महत्वाची माहिती आपण घेतली.

अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा विज्ञानाचा चमत्कार मानवा लागेल. इतके ते महत्वपूर्ण आहे.

अनेक अभ्यासक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक असणारी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन(International space station) संबंधी बेसिक माहिती आपणास कशी वाटली हे कमेंट द्वारे आम्हाला कळवा. व अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण वैज्ञानिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!