Science and Spirituality – विज्ञान आणि अध्यात्म यांचा तुलनात्मक अभ्यास.

Science and Spirituality – विज्ञान आणि अध्यात्म यांचा तुलनात्मक अभ्यास.

Science and Spirituality - विज्ञान आणि अध्यात्म यांचा तुलनात्मक अभ्यास.
S विज्ञान आणि अध्यात्म यांचा तुलनात्मक अभ्यास.

 

Science and Spirituality – सध्याचे जग विज्ञानाच आहे असं म्हणतात. परंतु विज्ञानाचा विकास होण्याआधी जगात अनेक
सभ्यता अतिशय प्रगत होत्या. भारतामध्ये सापडलेली हडप्पा संस्कृती कडे याचं उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल. केवळ भारतच नाही तर फ्रान्स, इजिप्त, जपान, युरोप इत्यादी अनेक देशांमध्ये प्रगत प्राचीन संस्कृती उपलब्ध होती असं दिसतं. यासाठी Science and Spirituality अर्थात विज्ञान आणि अध्यात्म यांचा केलेला संयुक्त अभ्यास.

जर विज्ञानाची प्रगती पंधराव्या सोळाव्या शतकापासून पुढे झाले असेल;  तर जगातील अनेक देशात सापडलेल्या प्राचीन संस्कृती इतक्या प्रगत कशा असा प्रश्न पडतो.  आणि याचा शोध घ्यायचे ठरले तर प्राचीन संस्कृती केवळ विज्ञानामुळे नाही तर बऱ्याच अंशी आध्यात्मामुळे सर्वश्रेष्ठ होत्या हे दिसतं.  Science and Spirituality हा त्यांचा प्रमुख मूलाधार होता.

 व्याख्या :- Science and Spirituality 

जगातील अनेक संस्कृत्या एवढ्यात प्रगत होत्या; आणि त्या अध्यात्म तसेच विज्ञान यामुळे होत्या; असं मानलं तर सर्वात आधी ध्यात्म म्हणजे काय ? तसेच विज्ञान म्हणजे काय यांचा विचार आधी करावा लागेल.  या दोहोंमधील विज्ञानाची व्याख्या काहीशी निश्चित आहे. म्हणून ती सहज देता येईल.  परंतु अध्यात्माची व्याख्या करणे एवढे सोपे नाही. हा Science and Spirituality मधील फरक आहे.

भौतिक विज्ञान हा एक प्रकारे ज्ञानाचा विशाल सागर आहे. मानवाला आवश्यक असणारी प्रत्येक भौतिक गोष्ट, ही विज्ञानाच्या साह्याने सहज मिळवता येते. विज्ञानाची मांडणी विशिष्ट पद्धतीने साचेबद्ध असते. विज्ञानाचे ज्ञान मिळवण्याची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत असते.

Science and Spiritualityमध्ये किंवा  विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीची व्याख्या विशिष्ट पद्धतीने केली जाते. व त्या व्याख्येनुसार त्याच संदर्भात ला अनुसरून असलेल्या इतर गोष्टी या वैज्ञानिक पातळीवर खोट्या ठरवता येत नाहीत. ही झाली साधी विज्ञानाची गोष्ट.

विज्ञान  :-

विज्ञाना नंतर अध्यात्माचा विचार पाहू. अध्यात्म या शब्दाची व्याख्याच आद्य आणि आत्मा यांचा मिलाप म्हणजेच अध्यात्म अशी करता येईल. Science and Spirituality एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते; विषयी ज्ञान मिळवण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला जातो तो अध्यात्ममार्ग असतो. विज्ञान आणि अध्यात्म यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. विज्ञान बाह्य जगाचा शोध घेण्यासाठी निघालेले असते.

पृथ्वी आकाश वायु व इतर ब्रह्मांड यांचा शोध यासाठी विज्ञान धडपडत असते. ब्रम्हांडा मध्ये उपलब्ध असणाऱ्या व मानवी ज्ञानाच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचा शोध विज्ञान घेत असतं. तर मानवाच्या अंतर्मनाचा ठाव, आत्म विषयी ज्ञान मिळवण्यासाठी अध्यात्म झटत असते. अर्थात अध्यात्म आणि विज्ञान या दोन स्वतंत्र अभ्यास शाखा आहेत. आत्मा, मन या गोष्टींचा अभ्यास विज्ञान करत नाही. असे म्हणणे चुकीचे आहे.

विज्ञान मानवाच्या सभोवताली असलेल्या ज्ञात गोष्टींचे अस्तित्व; त्याची पाळेमुळे, त्याची निर्मिती इत्यादी गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात जे डोळ्यांना दिसते त्यामागची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न खासकरून विज्ञान करते.  ब्रह्मांडाची व्यापकता, तसेच त्याची आज दिसणारे अस्तित्व इत्यादींचा शोध विज्ञाना मार्फत घेतला जाऊ शकतो. परंतु अध्यात्माचे मात्र तसे नाही.

अध्यात्मशास्त्र मध्ये आत्म्याचे ज्ञान मिळवलं जातं, किंवा तसा प्रयत्न केला जातो असे म्हटले तरी ते पूर्णतः खरे आहे असे नाही. कारण आध्यात्मामध्ये केवळ आत्मा नाही तर आत्म्यपेक्षाही वेगळ्या, अलौकिक आणि सार्वभौम शक्तीचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.  तसेच अशा शक्तीचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आत्मा आणि परमात्मा या दोन्हीचा संबंध याचा प्रयत्न होतो; त्यास तत्त्वज्ञान म्हणतात.

परंतु तरीही तत्त्वज्ञान आणि अध्यात्म ही एकच गोष्ट नाही. कारण अध्यात्म ईश्वराचं अस्तित्व शोधण्याचा मार्ग आहे. त्यातच स्वतःच्या अस्तित्वाचा ही समावेश होतो.

अध्यात्म ईश्वरप्राप्तीचा किंवा ईश्वरा संबंधित ज्ञान मिळवण्याचा प्रमुख मार्ग आहे.  तत्वज्ञान मात्र आत्मा परमात्मा न मानणार त्याच बरोबर नास्तिक सुद्धा असू शकते.  आध्यात्मामध्ये आत्मा आणि परमात्मा एकच आहे असे म्हणले जाते; तर तत्वज्ञान हे ईश्वराचं अस्तित्व नाकारणारे सुद्धा असू शकते.

त्याचबरोबर मनुष्याचे ब्रम्हांडामधिल स्थान किती शुल्लक आहे; व मनुष्यप्राणी ब्रह्मांडातील अतिशय क्षुद्र जीव आहे असे मानणारेही असू शकेल.

भारतीय अध्यात्म जागतिक करणाऱ्या

ISKCON विषयी सविस्तर माहिती पहा.

अध्यात्म महत्वाचे का आहे :-

मनुष्य ज्यावेळेस या अफाट सृष्टीकडे पाहतो, ब्रह्माण्डाच्या विस्तारा संबंधी विचार करायला लागतो,  त्यावेळेस त्याची जाणीव होते कि मनुष्यप्राणी हा या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी गुरफटलेला आहे.  ब्रह्मांड आतल्या काही अनाकलनीय तसेच अलौकिक शक्तीची जाणीव त्याला वेळोवेळी होते.  व अशा वेळेस तो स्वतःलाच अतिशय दुर्बल आणि अतिशय रुद्र जीव समजायला लागतो.

त्याचबरोबर मानवी शक्ती किती अपुरी आणि किती तोकडी आहे याची जाणीव झाल्यावर मात्र तो अस्वस्थ होतो. आणि त्याच वेळेस आत्मिक समाधान मिळवण्यासाठी तो विज्ञानाचा मार्ग थोडा बाजूला करून अध्यात्माच्या मार्गाने जाऊ लागतो.

Science and Spirituality मधील नाईलाज :-

ब्रह्मांडात घडणाऱ्या असंख्य चांगले वाईट गोष्टींचा विचार केल्यानंतर जे निर्माण झाले आहे, ती कधी ना कधी नष्ट होणारच आहे.  हा विचार माणसाला बेचैन करतो.  यावरचा उपाय तो भौतिक साधनांच्या सहाय्याने करू लागतो.  परंतु जेव्हा अशा प्रकारचे भौतिक साधने, आणि विज्ञान ज्या ठिकाणी हतबल होते, तेथून पुढे अध्यात्माची सुरुवात होते.

विज्ञानाला ज्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात यश आले नाही अशा प्रश्नांची उत्तरे अध्यात्मामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला जातो.  तसे पाहिले तर अध्यात्म मधील काही प्रश्नांची उत्तरे विज्ञान कदाचित देवही शकणार नाही.  परंतु विज्ञानाच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर अध्यात्मामध्ये मिळतेच मिळते. म्हणून Science and Spirituality हा स्वतंत्र अभ्यास विषय समजला जातो.

विज्ञानाच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे अध्यात्म देऊ शकेल.  परंतु अध्यात्माच्या प्रश्नांची उत्तरे मात्र विज्ञानाकडे समाधानकारक नाहीत.  अध्यात्माच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक पद्धतीने शोधता येणार नाही.  कारण तो वैज्ञानिक पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.  व तसा तो सुटणार नाही.

वैचारिक दृष्ट्या  Science and Spirituality मध्ये श्रेष्ठ काय ?

आत्मा काय आहे? आत्म्याचे स्वरूप कसे आहे? आत्म्याचे आणि जगाचे नाते काय आहे? या सृष्टीचा निर्माता कोण? आत्मा खरंच अमर आहे का? आत्म्याचा पुनर्जन्म होतो का? अशा प्रश्नांची उत्तरे विज्ञान कधीच देऊ शकणार नाही.

विज्ञानाची कसोटी ही अध्यात्माच्या कसोटी पेक्षा भिन्न असते. ज्यावेळेस पृथ्वीवर विज्ञान विकसित नव्हते. त्यावेळच्या प्राचीन सभ्यता या अध्यात्मावर आधारित होत्या. थोडक्यात अध्यात्म विज्ञानापेक्षा सरस आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

थोडक्यात :-

विज्ञान आणि अध्यात्म यांचा संयुक्त अभ्यास करणे, हे खूप मोठे धाडस म्हणता येईल. परंतु मानवाच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी या दोन्ही शाखांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. अध्यात्माचे महत्व, विज्ञानाची आवश्यकता व अध्यात्मिक विज्ञानाचा ध्यास मानवाची सर्व्भौमिक उन्नती साधू शकेल असा विश्वास धरायला काहीच हरकत नाही.

Science and Spirituality यांचा विचार आणि तुलनात्मक चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट द्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेब साईट ला नक्की भेट  द्या.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!