Satish Dhavan Space Center – सतीश धवन अंतराळ केंद्राविषयी सविस्तर माहिती.

Satish Dhavan Space Center – सतीश धवन अंतराळ केंद्राविषयी सविस्तर माहिती.

Satish Dhavan Space Center - सतीश धवन अंतराळ केंद्राविषयी सविस्तर माहिती.
Satish Dhavan Space Center – सतीश धवन अंतराळ केंद्राविषयी सविस्तर माहिती.

Satish Dhavan Space Center – देशाचा अंतराळ कार्यक्रम जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज पर्यंत असंख्य अंतराळ मोहिमांची आयोजन केलं. अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण केले. सर्वांमध्ये सतीश धवन अंतराळ केंद्र, अर्थात एस डी एस सी चा सिंहाचा वाटा आहे. आज आपण सतीश धवन स्पेस सेंटर विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

सतीश धवन कोण होते ?(Satish Dhavan)

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर मध्ये 25 सप्टेंबर 220 रोजी जन्मलेले सतीश धवन हे प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ होते. भारताच्या अंतराळ विषयक अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सतीश धवन यांचा महत्त्वाचावाटा होता. 1972 मध्ये विक्रम साराभाई यांच्यानंतर सतिष धवण इस्रोचे अध्यक्ष झाले. त्यांनी आपले शालेय शिक्षण अमेरिका भारतामध्ये पूर्ण केले. सॅटेलाइट कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंग या क्षेत्रात त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले.

१९५९ ते ६१ च्या काळात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम यांना वायू यान बनवताना आलेल्या अडचणी सतीश धवन यांनी दूर केल्या होत्या. एक प्रकारे ते डॉ. कलमांचे गुरु च होते.

१९७२ मध्ये त्त्यांची इस्रो च्या अध्यक्ष पदी निवड झाली. आणि त्याच बरोबर भारत सरकारच्या अवकाश संशोधन विभागातील सचिव पदावर मिळालेली नियुक्ती हि त्यांच्या अवकाश संशोधनाची पावतीच होती.

भारतामध्ये दूरसंचार उपग्रह अर्थात INSAT दूर संवेदन उपग्रह त्याच बरोबर पीएसएलव्ही अशा उपग्रह लॉंच करण्याची संसाधने सतीश धवन यांच्यामुळे भारतात शक्य झाली. अशा या महान शास्त्रज्ञाचा ३ जानेवारी २००२ रोजी देहान्त झाला.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे श्रीहरीकोटा स्थित इस्रोच्या महत्वपूर्ण उपग्रह प्रक्षेपण स्थळाला सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे.

सतीश धवन अंतराळ केंद्राचे ठिकाण :-Satish Dhavan Space Center.

आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यामध्ये श्रीहरीकोटा येथे असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र हे इस्रोचे प्रमुख अंतराळ प्रक्षेपण केंद्र आहे.

इस्रोच्या सहयोगाने 1969 मध्ये अंतराळामध्ये उपग्रह किंवा इतर गोष्टी पाठवण्यासाठी आंध्र प्रदेश मधील श्रीहरीकोटा या बेटाची निवड करण्यात आली. या बेटावर संपूर्ण सुविधांसह रॉकेट द्वारे अंतराळामध्ये काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी तयारी करण्यात आली. व 1971 मध्ये रॉकेट उड्डाणाची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली.

त्यानंतर अनेक सुधारणा च्या नंतर 10 ऑगस्ट 1979 ला एका कक्षीय उपग्रहाचे लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहिणी वन ए उपग्रहाच्या पहिल्याच उडान चाचणीला अपयश आले. उपग्रह प्रक्षेपण करण्याच्या रॉकेट मध्ये तांत्रिक बिघाड झालेले ही मोहीम रद्द करण्यात आली होती.

नवीन लॉन्च पॅड :-

सप्टेंबर 2002 मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे महत्वाचे  वैज्ञानिक तसेच इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांच्या स्मरणार्थ या उपग्रह प्रक्षेपण स्थळाला सतीश धवन स्पेस सेंटर Satish Dhavan Space Center –  हे नाव दिले गेले.

जसे वेगवेगळे वैज्ञानिक शोध लागत गेले त्याप्रमाणे इस्रोने आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुविधा सुविधा अद्ययावत केल्या. आज इस्रो कडे दोन अंतराळामध्ये उपग्रह किंवा तत्सम गोष्टी पाठवण्यासाठी दोन लॉन्च पॅड उपलब्ध आहेत. सतीश धवन स्पेस सेंटर (Satish Dhavan Space Center) सोबतच 2005 यावर्षी इस्रोने नवीन लॉन्च पॅड बांधला.

नव्याने निर्माण केलेला हा लॉन्च पॅड एक प्रकारे सार्वजनिकच आहे. इस्रोच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमा याच लॉन्च पॅड वरून लॉंच केले गेले आहेत. इस्रो कडे दोन लॉन्च पॅड असल्याने इस्रोची ताकत वाढली आहे. कारण इस्रो आता एकाच वेळेस अनेक यान किंवा उपग्रहांचे प्रक्षेपण करू शकते. पूर्वी भारताला एकावेळी एकच अंतराळ मोहीम राबवता येत होती. परंतु आता भारताची अंतराळ मोहिमा बाबतची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे.

Satish Dhavan Space Center ची महत्वाची मोहीम.

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चंद्रयान-1 हे 22 ऑक्टोबर 2008 या दिवशी सकाळी सहा वाजून 22 मिनिटांनी यशस्वी रित्या प्रक्षेपित केले गेले. सतीश धवन अंतराळ केंद्रांमधून प्रक्षेपित केले गेलेले मंगळ यान 5 नोव्हेंबर 2013 ते 24 सप्टेंबर 2014 इतक्या दिवसांचा यशस्वी प्रवास करून मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिर झाले. ही मोहीम भारताची ऐतिहासिक मोहीम ठरली.
2019 मध्ये एस पान्डीयन हे एस डी एस सी चे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त झाले. आणि अरुमुगम राजराजन हे सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक बनले.

विक्रम साराभाई यांच्यापासून ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी भारताचा अंतराळ कार्यक्रम जगाला दाखऊन दिला. अंतराळ क्षेत्रामध्ये भारताचा नावलौकिक झाला तो अशाच महान शास्त्रज्ञांमुळे. त्यातच सतीश धवन Satish Dhavan  यांच्या रूपाने देशाला एक महान संशोधक शास्त्रज्ञ लाभला.

आज सतीश धवन अंतराळ केंद्रामधून( Satish Dhavan Space Center) अनेक यशासि मोहीमा भारताने राबवल्या. स्वदेशी बनावटीच्या तसेच अनेक विदेशी उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करण्यासाठी सतीश धवन अंतराळ केंद्राचा महत्वाचा वाट आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी महत्व पूर्ण योगदान देणाऱ्या या महान शास्त्रज्ञाला शतशः नमन

एस.डी.एस.सी.

ला प्रत्यक्ष भेट देण्यासाठी

येथे क्लिक करा.

सतीश धवन Satish Dhavan  यांचा अल्प परिचय आणि अंतराळ क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दिलेली हि माहिती कशी वाटली. आम्हाला कॉमेंट करून सांगा. यात काही सुधारणांची गरज असल्यास नक्की सुचवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी आमच्या वेब साईट ला नक्की भेट द्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!