NASA upcoming space misions- नासाच्या पुढील अंतराळ मोहिमा कोणत्या?

NASA upcoming space misions- नासाच्या पुढील अंतराळ मोहिमा कोणत्या?

NASA upcoming importent space misions- नासाच्या पुढील महत्वाच्या अंतराळ मोहिमा कोणत्या?
NASA upcoming importent space misions- नासाच्या पुढील महत्वाच्या अंतराळ मोहिमा कोणत्या?

 

NASA upcoming space misions-अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा जगातील एक महत्वाची अंतराळ संशोधन संस्था आहे. आतापर्यंत अंतराळ मधील असंख्य शोध नासाने लावले आहेत.

अंतराळ मधून पृथ्वीकडे येणारे  लघुग्रह असोत; किंवा अंतराळा मधून पृथ्वीला धोका निर्माण होण्याची शक्यता असेल. अशा प्रकारच्या संकटाच्या वेळी नासा हि महत्वाच्या भूमिकेत असते.

29 जुलै 1958 नासाच्या स्थापनेपासून आज पर्यंत अनेक अंतराळ मोहिमा  राबवण्यात आल्या. पण NASA upcoming space mision- नासाच्या पुढील अंतराळ मोहिमा कोणत्या? यांचा विचार यालेखात करणार आहोत.

आज पर्यंत नासाने अनेक उपग्रहांच्या मदतीने ब्रम्हांडामधिल असंख्य रहस्यांचा शोध लावला आहे तात्कालीन अमेरिकन सरकारने तांत्रिक संशोधनाकडे केंद्रित करण्यासाठी तसेच अवकाशा संबंधी शोध लावण्यासाठी नासाची स्थापना करण्यात आली.

स्थापनेपासून नासा आज पर्यंत अविरत कार्यरत आहे. नासाच्या प्रमुख अध्यक्ष पदावर आज पर्यंत अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे. सध्या नासाचे चौदावे अध्यक्ष बिल नेल्सन यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्वाच्या मोहिमा आखलेल्या आहेत.

या नवीन मोहिमा कोणत्या? व त्यांची उद्ध्येश्य काय?

१ ) मिशन युक्लीड(EUCLID) :-

E S A अर्थात युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा यांच्या ब्रह्मांडाची रचना तसेच ब्रह्मांडाची उत्क्रांती यासंबंधी महत्वाचे शोध लावण्यासाठी मिशन युक्लीड ही मोहीम राबवण्यात येत आहे.

दिनांक १ जुलै २०२३ स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:११ वाजता ही मोहीम फत्ते केली जाईल.  केप क्यान्वेरल मधून या मोहिमेसाठी सुसज्ज असलेले स्पेस एक्स फाल्कन ९ या रॉकेटच्या सहाय्याने सदरील यानास प्रक्षेपित केले जाईल.

आंतरराष्ट्रीय अवकाश प्रयोगशाळेमध्ये अनेक देशांचे शास्त्रज्ञ जीव धोक्यात घालून अंतराळामध्ये काम करत असतात. या ठिकाणी शास्त्रज्ञांची सतत आदला बदल होत असते.

ठराविक कालावधी अंतराळात राहिल्यानंतर नवीन शास्त्रज्ञांना येथे पाठवले जाते व आधीच्या शास्त्रज्ञांना परत आणले जाते. याच मोहिमेचा एक भाग म्हणून नासाने पुढील योजना आखलेली आहे.NASA upcoming space mision- नासाच्या पुढील अंतराळ मोहिमा कोणत्या? यांचा विचार करताना पुढील मोहीम महत्वाची वाटते.

२) स्पेस एक्स क्रो 7 लॉन्च. :-

NASA upcoming space misions इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर या आधीच असलेल्या क्रू मेंबर मध्ये वाढ करायची आहे. आणखी काही मेंबर्स पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अवकाश संशोधक अंतराळवीर जास्मिन मोगबेली आहेत. व अंद्रियास मोगेनसेन यांच्यासह आणखी काही विशेषज्ञ यापूर्वीच्या स्पेस स्टेशन शास्त्रज्ञांमध्ये सामील होणार आहेत.

इतर महत्वाच्या माहितीसाठी

येथे क्लिक करा.

युरोपियन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर असलेले मोगेनसेन पायलट म्हणून काम पाहतील. तर नासाचे अंतराळवीर असलेले जास्मिन मोगबेली हे स्पेस क्राफ्ट चे कमांडर म्हणून काम पाहतील.

२०२३ च्या ऑगस्ट महिन्याच्या मध्यात सदरील मोहीम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. स्पेस एक्स फाल्कन-9 या रॉकेट वरून या मिशनचे प्रक्षेपण होईल.तर प्रक्षेपणाचे ठिकाण असेल फ्लोरिडा मधील नासाचे केनेडी स्पेस सेंटर.

नासा आपल्या अधिकारा अंतर्गत वेगवेगळ्या देशांच्या अंतराळ स्थानकासाठी आवश्यक ती मदत करत असते. अनेक देशांच्या अंतराळ मोहिमांसाठी नासा मदतीचा हात पुढे करते. याचाच एक भाग म्हणून नासाची आणखी एक महत्वाची मोहीम लॉन्च होत आहे.

३) नॉर्थरोप गृमन (NG CRS-19 ) :-NASA upcoming space misions

जागतिक दर्जाच्या असलेल्या नोर्थ्रोप गृमन च्या अंतराळ स्थानकासाठी एकोणिसावी व्यावसायिक पुनर पुरवठा सेवा, करार, नियम, शर्ती इत्यादींचे नियोजन करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केलं गेलं आहे.

२०२३ मध्ये होत असलेल्या नासाच्या मोहिमांमध्ये पुढील चंद्र मोहिमेचा सुद्धा समावेश आहे.

४) फायर फ्लाय एरोस्पेस कमर्शियल लोनर पेलोड सेवा :-

चंद्राच्या पृष्ठभागावरील नॉन ध्रुवीय प्रदेशामधील, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक यांचे संकलन करणे हा एक मुद्दा आहे. विज्ञान संबंधित दहा महत्वाच्या तपासण्या करण्यासाठी या मोहिमेचा फायदा होणार आहे.

सदरील मोहिमेचा जवळपास अंतिम टप्पा हा पुढील आठवड्यात काय होईल. म्हणजेच पुढच्या आठवड्यात नासाने पाठवलेले यान चंद्रावर सुरक्षित रित्या लँडिंग होईल.

५) लुनर ट्रेलब्लेझर :-

SIMPLEx अर्थात स्मॉल इनोव्हेटिव्ह मिशन फोर प्लॅनेटरी एक्स्प्लोरेशन हि नासाची योजना आहे. या नासाच्या बहुउद्देशीय योजने अंतर्गत, लुनर टेलब्लेझर या मोहिमेचे आयोजन केलं गेलं आहे.

चंद्रावरील पाण्याची उपलब्धता, चंद्रावरील पाण्याचे जलचक्र, त्याच बरोबर वितरणाची माहिती देण्यासाठी खास करून एक छोटासा उपग्रह तयार केलेला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये CLPS फ्लाईट IM-2 वरून या उपग्रहाच लॉन्चिंग करण्यात येईल.

६) बोईंग कृ फ्लाईंग टेस्ट :-

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मध्ये जाणाऱ्या तेथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना; किंवा अंतराळवीरांना स्थानकापर्यंत नेण्याची व तेथून सुरक्षितरीत्या परत आणण्याची क्षमता, सिद्ध करण्यासाठी युनायटेड लॉन्च अलाइंस एटलस व्ही आणि स्टार लाईनर या रॉकेटची चाचणी घेतली जाईल.

या मोहिमेची तारीख अजून घोषित झालेली नाही, परंतु अंतराळवीरांना घेऊन यशस्वी चाचणी उड्डाण केल्यानंतर हे अंतराळ यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर आपले नियोजित काम करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

७) Plancton airosale cloud osion echosystem :-

लहान लहान सागरी वनस्पती, त्याचबरोबर सागरात साखळी ज्यांच्यामुळे टिकून आहे अशा प्रकारचे शैवाल यांच्या वितरणाचे मोजमाप करून सामुद्रिक अर्थात समुद्राचे आरोग्य कसे आहे, याचे मूल्यमापन करण्यासाठी PACE या मोहिमेचे आयोजन केलेले आहे. ही मोहीम जानेवारी 2024 मध्ये पूर्ण केली जाईल.

८) स्पेस एक्स क्रू 8 :-NASA upcoming space misions

नासाच्या अंतराळ मोहिमांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या फाल्कन 9 व स्पेस एक्स ड्रॅगन या रॉकेट साठी हार्डवेअर वाटप करण्याच्या उद्देशाने या मोहिमेचं नियोजन केलेलं आहे. ही मोहीम फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्णत्वास नेले जाईल.

नासा ची अधिकृत वेबसाईट येथे पहा.

9) निसार (NISAR) :-

जमिनीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म बदल त्याचबरोबर काही गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी निसार मोहीम राबवली गेलेली आहे.

या मोहिमेअंतर्गत भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवणे, ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची चिन्हे तपासणे, समुद्राच्या पाणी पातळी मध्ये वाढीची कारणे शोधणे, त्याचबरोबर जगभरातील वेगळ्या प्रकारच्या मधील लहान-सहान बदलांचे निरीक्षण करणे या उद्देशाने ही मोहीम राबवली गेली आहे.

थोडक्यात :-

या होत्या अमेरिकेतील नासा अर्थात अंतराळ संशोधन संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण मोहिमा.NASA upcoming space misions.

याच बरोबर नासाच्या आणखीही अनेक महत्त्वाच्या योजना येत्या वर्षभरात होणार आहेत. काही अमेरिकेच्या स्वतःच्या आहेत तर इतर देशांच्या मदतीने राबवलेल्या आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. तुमच्या मार्गदर्शक सूचनांचे स्वागत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!