Maharashtra state – महाराष्ट्र राज्याविषयी मुलभूत माहिती.

Maharashtra state – महाराष्ट्र राज्याविषयी मुलभूत माहिती.

Maharashtra state - महाराष्ट्र राज्याविषयी मुलभूत माहिती.
Maharashtra state – महाराष्ट्र राज्याविषयी मुलभूत माहिती.

 

Maharashtra state-महाराष्ट्र हे भारतातील २९ राज्यांपैकी एक प्रमुख राज्य आहे. Maharashtra state – महाराष्ट्र राज्याविषयी मुलभूत आणि महत्वाची माहिती या लेखात पाहणार आहोत. महाराष्ट्राला भारताचे केंद्र देखील म्हणतात. कारण भारताचा मध्यबिंदू असलेले नागपूर हे ठिकाण महाराष्ट्रामध्येच आहे. उत्तर आणि दक्षिण भारत या भारताच्या दोन भूभागांना जोडणारी महाराष्ट्र हि एक विशाल भूमी आहे.

रचना व आकार :-

त्रिकोणाकृती व्ही आकारासारखा दिसणारा हा विशाल भूभागआहे. या राज्याचा आकार उत्तर दिशेकडे रुंद, तर याचा दक्षिण भाग चिंचोळा आहे. कोकण प्रांतामध्ये पाया. तर विदर्भामध्ये निमुळता होत गेलेला आकार अशी याची रचना आहे.

क्षेत्रफळ :-

पूर्व पश्चिम लांबी तर दक्षिण उत्तर रुंदी ग्राह्य धरल्यास; लांबी जवळपास ८०० किलो मीटर; तर रुंदी सुमारे ७२० किलो मीटर इतकी भरते. महाराष्ट्राचे (Maharashtra state) एकूण क्षेत्रफळ पहिले तर तीन लाख सात हजार सातशे तेरा (३,०७,७१३) किलो मीटर इतके आहे.
देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकट्या महाराष्ट्राने देशाची 9.36 % इतकी जमीन व्यापली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र (Maharashtra state) हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.

प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्राची प्रशासकीय विभागानुसार रचना केलेली आहे. यात सहा विभाग केले आहेत. ते पुढील प्रमाणे :-

1)कोकण, 2)नाशिक, 3)पुणे, 4)नागपूर, 5)अमरावती, 6)औरंगाबाद.

1) 7 जिल्हे आणि 50 तालुके मिळून कोकण प्रांत. मुख्यालय – राजधानी मुंबई.
2) 5 जिल्हे व 54 तालुके यांचा मिळून उत्तर महाराष्ट्र व खानदेश. मुख्यालय – नाशिक.
3) 5 जिल्हे व 58 तालुक्यांचा मिळून पश्चिम महाराष्ट्र. मुख्यालय – पुणे.
4) 6 जिल्हे आणि 64 तालुक्यांचा मिळून विदर्भ. मुख्यालय – नागपूर.
5) 5 जिल्हे आणि 56 तालुके मिळून पुन्हा विदर्भ. मुख्यालय – अमरावती.
6) 8 जिल्हे व 76 तालुक्यांचा मिळून मराठवाडा. मुख्यालय औरंगाबाद.

सीमा निश्चिती :-

प्रशासनाच्या सोई नुसार महाराष्ट्राच्या सीमा दोन प्रकारे निश्चित केल्या आहेत. पहिली राजकीय महाराष्ट्र. आणि दुसरी नैसर्गिक महाराष्ट्र.

महाराष्ट्राच्या (Maharashtra state) प्रशासकीय सोयीसाठी राजकीय सीमा निश्चित केल्या गेल्या आहेत. यामध्ये पूर्व दिशेला छत्तीसगड राज्य असून उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य आहे. दक्षिण दिशा ही कर्नाटक आणि या राज्यांनी थांबवली . तर आग्नेय दिशेला आंध्र प्रदेश आणि वायव्य दिशेस दादरा व नगर हवेली तसेच गुजरात ही राज्ये आहेत.

महाराष्ट्राच्या नैसर्गिक भागावरून महाराष्ट्राची नैसर्गिक सरहद्द ठरवण्यात आलेली आहे.

यामध्ये, महाराष्ट्राच्या (Maharashtra state) वायव्य दिशेस सातपुडा पर्वता मधील आक्रणी टेकड्या, सातमाळा डोंगररांगा तसेच गाळणा टेकड्या या आहेत.
ईशान्य दिशेला चिरोळी टेकड्या, भामरागड डोंगर व दरेकासा टेकड्या आहेत. उत्तरेला सातपुड्याच्या पर्वत रांगा आणि पूर्वेला गाविलगडाच्या टेकड्या आहेत.

दक्षिणेला हिरण्यकेशी नदी कोकणातील तेरेखोल नदी असून संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ही अरबी समुद्राने व्यापलेला आहे.
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे तीन प्रमुख भाग पडतात.

1) महाराष्ट्र पठार. यास दख्खनचे पठार असेही म्हटले जाते.

2) कोकण किनारपट्टी.

3) सह्याद्री पर्वत. यास पश्चिम घाट असेही म्हटले जाते.

महाराष्ट्र पठार/दख्खन चे पठार :-

दख्खनचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूभागाने महाराष्ट्राच्या (Maharashtra state) एकूण क्षेत्रफळ यामधील 90 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.
पूर्व-पश्चिम आठशे किलोमीटर तर दक्षिण-उत्तर सातशे किलोमीटर एवढ्या विस्तीर्ण काय क्षेत्रामध्ये दख्खनचे पठार पसरलेले आहे.

समुद्र सपाटीपासून सुमारे साडे चारशे मीटर इतकी दख्खनच्या पठाराची उंची आहे. पश्चिमेस जास्त म्हणजेच अंदाजे 600 मीटर; पूर्वेस कमी म्हणजेच सरासरी 300 मीटर इतकी उंची आहे. संपूर्ण दख्खनचे पठार हे अनेक नद्या उपनद्या, डोंगर रांगा तसेच केले आहे दऱ्या खोरे यांनी व्यापलेले आहे.

कोकण किनारपट्टी :-

सह्याद्री पर्वतापासून ते अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या दक्षिणोत्तर विस्तीर्ण पट्टा हा कोकण किनारपट्टी म्हणून ओळखला जातो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमुळे कोकण किनारपट्टी आगळी वेगळी समजली जाते. फणस आणि नारळे यासाठी कोकण देशभरात ओळखले जाते. उत्तरेस असलेल्या दमनगंगेपासून ते दक्षिणेतील तेरेखोल खाडीपर्यंत कोकणाचा विस्तार आहे.

दक्षिणोत्तर लांबी जवळपास सातशे वीस (७२०) किलो मीटर; तर रुंदी तीस ते साठ (३० – ६० ) किलो मीटर इतकी आहे. हीच रुंदी उत्तर भागात नव्वद ते पंच्याण्णव किलो मीटर(९०-९५ ) असून, दक्षिणेत चाळीस ते पंचेचाळीस किलो मीटर इतकी आहे. कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ तीस हजार तीनशे चौर्याण्णव (३०३९४) किलो मीटर एवढे आहे.

पश्चिम घाट/ सहयाद्री पर्वत :-

महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणे कडील डोंगर दऱ्यांनी व पर्वत रांगांनी सजलेला वैशिष्ट्य पूर्ण भूभाग म्हणजे सह्याद्री पर्वत होय. अशी पश्चिम घाटाची व्याख्या करता येईल. सह्याद्री पर्वत पश्चिमेकडून पाहिल्यास अतिशय विशाल उंच सेच सरळ भिंत बांधल्या सारखा दिसतो. तर दख्खनच्या पाठराकडून मात्र अतिशय मंद उताराचा दिसतो.

सह्याद्री पर्वत अति प्राचीन असून अनेक धार्मिक ग्रंथ तसेच पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो. सह्याद्री पर्वताभोवती अनेक कथा दंतकथा गुंफलेल्या आहेत. रामायण तसेच महाभारतातील अनेक कथा सह्याद्रीवर आधारित आहेत.

प्राचीन काळी अत्यंत कणखर असलेल्या या पर्वताची असंख्य ठीकांनी कमी जास्त प्रमाणात झीज झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणे कमी अधिक प्रमाणात उंच, अति उंच, सखल, खोलगट अशी बनेली आहेत. म्हणूनच सह्याद्री पर्वतामध्ये अनेक शिखरे, घाटमाथे, डोंगर, तसेच उंचावरील विस्तीर्ण पठारे पाहायला मिळतात.

भारताच्या राजकीय तसेच आर्थिक दृष्टीने महाराष्ट्र (Maharashtra state) हे अत्यंत महत्वाचे राज्य आहे. भारताचा आर्थिक कणा हा महाराष्ट्र समजला जातो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पौराणिक दृष्ट्या सुद्धा महाराष्ट्राचे महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे.

रामायण काळात प्रभू रामचंद्र, सीता व लाक्ष्मण यांच्या सोबत वनवासी म्हणून आले. त्यांचा वनवासाचा अधिक काळ हा महाराष्ट्रात (Maharashtra state) व्यतीत झाला. असा रामायणात उल्लेख आहे.
महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य, जन्म भूमी आणि कर्मभूमी आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ हि महाराष्ट्रातच रोवली होती.

महाराष्ट्राचे प्रमुख सन्मान चिन्हे :-
स्थापना -: 1 मे 1960.
राजभाषा -: मराठी.
राजधानी -: मुंबई.
उपराजधानी -: नागपूर.
राज्य प्राणी -: शेकरू.
राज्य पक्षी -: हरियाल.
राज्य फुल -: तामण.
राज्य फळ -: आंबा.
एकूण जिल्हे -: 36.
एकूण तालुके -: 358.

प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास

समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

थोडक्यात :-

भारताच्या राजकीय, आर्थीक, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra state) राज्याची महत्वाची मुलभूत महिती आपण पहिली. स्पर्धा परीक्षेचे विध्यार्थी तसेच शालेय शिक्षक व विद्यार्थी यांच्या साठी आवश्यक असलेली हि माहिती निश्चितच उपयुक्त आहे.महाराष्ट्र राज्याची (Maharashtra state) दिलेली हि माहिती तुम्हाला कशी वाटली. हे कॉमेंट करून सांगा. यात काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या सुचवा. तुमच्या सूचनांचे स्वागत आहे.
त्याचप्रमाणे असेच माहितीपूर्ण लेख व महत्वाच्या जागतिक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या वेब साईट ला आवश्य भेट द्या.

 

Leave a Comment

error: Content is protected !!