Chandryaan-3 – चांद्रयान-३, भारताची महत्वाकांक्षी मोहीम.

Chandryaan-3 – चांद्रयान-३, भारताची महत्वाकांक्षी मोहीम.

Chandryaan-3 - चांद्रयान-३, भारताची महत्वाकांक्षी मोहीम.
Chandryaan-3 – चांद्रयान-३, भारताची महत्वाकांक्षी मोहीम.

 

Chandryaan-3.भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) बहुचर्चित चंद्रयान 3 ( chandra yaan 3 ) या मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 14 जुलै 2023 रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी या मोहिमेचे प्रक्षेपण होणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होईल.

चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 Chandryaan-3  :-

चंद्रावर अंतराळ यान पाठवण्यासाठी आखण्यात आलेली Chandryaan-3 ही इस्रोची तिसरी मोहीम आहे. इस्रोची चंद्रयान 2 ही मोहीम शेवटच्या क्षणी असफल झाल्यामुळे, चंद्रयान 3 ही मोहीम आखण्यात आली आहे. चंद्रावर सुरक्षित रित्या लँडिंग न करता आल्याने चंद्रयान 2 या मोहिमेने थोडक्यात धोका दिला होता. जीएसएलव्ही 3 या वाहनाद्वारे अंतरिक्ष मध्ये सोडलेले हे यान चंद्रावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले.

चंद्रयान 2 हे ज्याठिकाणी लँडिंग होणार होते; तेथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून भरकटले. व त्याची व्यवस्थित लँडिंग होऊ शकली नाही. त्याच वेळी त्याचा जमिनीवरील संपर्क तुटला. व यशस्वीतेच्या शेवटच्या टप्प्यात ही मोहीम फसली. या मोहिमे मध्ये परिभ्रमण रोवर तसेच लेंडर यांचा समावेश होता.

14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्रयान 1 ही मोहीम यशस्वी झाली होती. त्यानंतर चंद्रयान 2 ही मोहीम 22 जुलै 2019 रोजी यशस्वी केली होती. त्यानंतर ओर्बिटरने चंद्रावरील घेतलेल्या थर्मल इमेज मधून लेंडर चा शोध लागला आहे. परंतु चंद्रयान 2 शी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

या व अशा अनेक कारणांमुळे चंद्रयान 2 या मोहिमेचे सुधारित आवृत्ती म्हणून चंद्रयान 3 Chandryaan-3 कडे पाहिले जाते. चंद्रयान 2 इस्रो आणि रशियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अंतराळ संस्थेच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने या मोहिमेला मान्यता दिली होती.

चंद्रयान 2 मधील चुका :-

चंद्रयान मोहीम याचा संपूर्ण आराखडा ज्या प्रमाणे तयार करण्यात आला होता, त्या निश्चित त्यानुसार मोहीम पुढे सरकू शकली नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून सुमारे 600 किलो मिटर अंतरापर्यंत रोवर लँड करण्याची जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु लँडिंग च्या अगदी शेवटच्या क्षणी चंद्राच्या पृष्ठभागापासूनअवघ्या दोन किलो मीटर इतक्या अंतरावरूनच यानाचा चा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

जेणेकरून 180 ते 200 किलोमीटर प्रतितास हा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास इतका करण्याची आवश्यकता होती. परंतु त्याला नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटल्यामुळे ते शक्य झाले नाही. सुरक्षित लँडिंग करण्यासाठी आवश्यक असणारी योग्य गति लेंडर ला न मिळाल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले. परिणामी ही संपूर्ण मोहिम थांबविण्यात आली. त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास आला नाही. चंद्रावरील पाण्याचा शोध, तसेच इतर धातूंचा शोध आणि मोहिमेच्या निश्चित केलेल्या उद्देश यांना ब्रेक घ्यावा लागला.

चंद्रयान 3 मधील सुधारणा :-

चंद्रयान 3 ही मोहीम सुद्धा चंद्रयान 2 प्रमाणेचअसेल. परंतु मागच्या वेळी झालेल्या चुका यावेळी होणार नाहीत, तशी पूर्णतः दक्षता घेतली जाईल.

1) यावेळी याना साठी आवश्यक असलेली इंधनाची क्षमता वाढवण्यात आलेली आहे. अर्थात मागच्या वेळी पेक्षा जास्त इंधन यावेळी याना सोबत पाठवले जाईल.

2) तिसऱ्या चंद्रयानाचे लेंडिंग लेग अधिक मजबूत आणि अधिक कार्यक्षम बनवलेले आहेत. चांद्रयानावर देखरेख ठेवण्यासाठी बसवण्यात आलेले सेंसर मागच्या वेळी पेक्षा जास्त आहेत. हे सेन्सर पृष्ठभागापासून दोन किलोमीटर असतानाच ॲक्टिव होतील.

3) अधिक ऊर्जेची आवश्यकता भासल्यास ती कमतरता भरून काढण्यासाठी; अधिक मोठे सोलर सेल बसवण्यात आलेले आहेत. ज्यामुळे ऊर्जेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही.

4) अधिक सुधारित आवृत्ती चे सॉफ्टवेअर यामध्ये वापरण्यात आलेले आहेत.

5) चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी लँडिंग होणार आहे; ते ठिकाण बदलण्याचा पर्याय सुद्धा आता उपलब्ध असेल. निश्चित केलेल्या जागेवर लेंडिंग करण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आता ती जागा बदलण्याची सोय करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाच्या सोयीनुसार आता लेंडिंग करता येऊ शकणार आहे.

6) जर वेळेमध्ये बदल करावयाचे झाले तर तेही शक्य होणार आहे. मागच्यावेळी ऑर्बिटर, लँडर तसेच रोव्हर यांचा वापर केला गेला होता. परंतु यावेळी मात्र लेंडर आणि रोव्हर यांचा वापर होईल; परंतु ऑर्बिटर मात्र वापरले जाणार नाही.कारण मागच्या वेळी वापरात आणलेले ओर्बिटेर अजूनही कार्यरत आहे. चंद्राच्या कक्षे भोवती त्याचे भ्रमण सुरु आहे. चंद्रयान 3 Chandryaan-3 साठी त्याच्या प्रोपल्शन मॉडेलचा वापर केला जाईल. हे मॉडेल कम्युनिकेशन रिले उपग्रहाचे काम करेल.

चंद्राच्या शंभर किलोमीटर उंच एवढ्या कक्षे पर्यंत रोवर आणि लेंडर यांच्यावर नियंत्रण ठेवेल. त्याच बरोबर पृथ्वीच्या ध्रुवीय मोजमापाचा अभ्यास करणारा SHAPE नावाचा पेलोड सुद्धा अंतराळामध्ये नेला जात आहे.

Chandryaan-3 चंद्रयान 3 मोहिमेचे उद्दिष्ट :-

  • सध्या या मोहिमेसाठी काही महत्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
  • सर्वात प्रथम मागच्या वेळी आलेल्या अडचणी यावेळेस न होऊ देण्यासाठी; सुरक्षित रित्या आणि व्यवस्थित लँडिंग करणे.
  • चंद्रावर रोव्हर कशा प्रकारे काम करते व त्यात आणखी काही सुधारणा करता येतात का याचाही अभ्यास करणे.
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग कशा प्रकारचा बनलेला आहे; चंद्रावर कुठले सैनिक उपलब्ध आहेत का? यासंबंधी शोध लावणे.
  • मिथेन, अमोनिया, पारा त्याचबरोबर द्रवरूपातील पाणी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल
  • चंद्रावरची माती, उपलब्ध असेल तर पाणी, तसेच इतर नैसर्गिक घटकांचा वर प्रयोग करणे.
  • चंद्राची निर्मिती, त्यामागचे रहस्य, त्याची रचना यांचा सखोल अभ्यास करून त्यासंबंधीत विज्ञान अधिक प्रगत करणे.
  • यासारख्या महत्त्वाच्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून चंद्रयान 3 या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे.

 

तिसऱ्या चंद्रयान Chandryaan-3 मोहीम याचे वैशिष्ट्य :-

भारताच्या कोणत्याही अंतराळ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. कारण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्तम कामगिरी करण्यासाठी इस्रोला बरोबर ओळखले जाते. 2014 साली भारताचे अंतराळ मोहिमांसाठी चे राखीव बजेट हे सहा हजार कोटी रुपये होते. हेच बजेट 2023-2024 साली मागच्या दुपटीपेक्षा ही अधिक म्हणजेच सुमारे 12544 कोटी रुपये इतकीआहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष के सिवन यांच्या मते चंद्रयान 3 या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.

अधिक माहिती साठी

ISRO च्या संकेतस्थळाला भेट द्या.

थोडक्यात :-

भारताने आधीपासूनच स्वदेशीचा पुरस्कार केला आहे. व अधिकांश अंतराळ मोहिमा या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित केल्या आहेत. त्याच बरोबर स्वदेशी तंत्रज्ञानाला सोबतच अनेक आंतरराष्ट्रीय मोहिमांना सुद्धा भारतीय तंत्रज्ञानाने लावला आहे. अनेक देशांच्या अंतराळ मोहिमा या भारताच्या सहयोगाने पूर्णत्वास गेलेल्या आहेत.

करोडो भारतीयांच्या आणि जगभरातील अवकाश प्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या Chandryaan-3 चंद्रयान 3 या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहिली. दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे कळवा. त्याच बरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच जगभरातील महत्त्वाच्या ताज्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!