Awards in India – भारत सरकार तर्फे दिले जाणारे 5 महत्त्वाचे पुरस्कार.

Awards in India – भारत सरकार तर्फे दिले जाणारे 5 महत्त्वाचे पुरस्कार.

Awards in India - भारत सरकार तर्फे दिले जाणारे 5 महत्त्वाचे पुरस्कार.
Awards in India – भारत सरकार तर्फे दिले जाणारे 5 महत्त्वाचे पुरस्कार.

 

Awards in India-पचिन काळापासून भारत देश कला, साहित्य, नाट्य इत्यादी क्षेत्रात अग्रेसर आहे. या क्षेत्रातील गुणवंतांचा यथोचित सन्मान व्हावा, या हेतूने भारत सरकार दरवर्षी गुणवान प्रतिभावान व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करत असते. भारतामधील प्रमुख पुरस्कार आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांच्या विषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये मिळणार आहे.

आपापल्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती या सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारास पात्र ठरतात. मान्यवरांचा सन्मान आणि गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे पुरस्कार सरकारकडून दिले जातात.

भारतातील प्रमुख महत्त्वाचे पुरस्कार, Awards in India :-

1) कालिदास सन्मान :-

नृत्यकला व नृत्यसाधना, संगीत आणि चित्रकला इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यताप्राप्त कलाकारांसाठी हा पुरस्कार दिला जातो. कालिदास सन्मान हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारच्या वतीने प्रदान केला जातो. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असलेला हा एक प्रमुख पुरस्कार आहे.

महाकवी कालिदास यांच्या नावे दिला जाणारा कालिदास सन्मान पुरस्कार 1980 सालापासून दिला जातो. संगीत आणि नृत्य क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या सरकार नियुक्त समितीच्या माध्यमातून विजेत्यांची निवड केली जाते. दोन लाख रुपये (२,०००००-/) रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा एक महत्वाचा भारतीय पुरस्कार (Awards in India) आहे.

काही प्रमुख विजेते :-

1) रुक्मिणी देवी अरुंदळे.2) पंडित बिरजू महाराज. ३) वेदांतम सत्यनारायण शर्मा. 4) जे. स्वामीनाथन. 5) अकबर पदमसी. 6) विजय तेंडुलकर. 7) शीला भाटिया. 8) डॉक्टर श्रीराम लागू. 9) बाबासाहेब पुरंदरे. १०) उस्ताद झाकीर हुसेन. या काही महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कालिदास सन्मान पुरस्कार सोबत जोडली गेली आहेत.

2) साहित्य अकादमी पुरस्कार :-

कोणत्याही भारतीय भाषेमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रतिभावान लेखकास, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतातील भाषिक संवर्धनासाठी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेले आहे. 12 मार्च 1954 रोजी स्थापन झालेली साहित्य अकादमी, अनेक नामवंत साहित्यिकांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे.

भारतीय पुरस्कारातील (Awards in India) हा दुसरा महत्वाचा पुरस्कार आहे.

साहित्य अकादमीतर्फे गुणवंत व प्रतिभावान लेखक यांना दरवर्षी सन्मानित करत असते. साहित्य अकादमी मार्फत भारतातील 24 वेगवेगळ्या भाषेतील साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमी मार्फत वेगवेगळ्या लेखकांसाठी साहित्य निर्मिती, प्रवास बरोबर साहित्यनिर्मिती संबंधित गोष्टींसाठी अर्थसहाय्य केले जाते.

भारतातील पुरस्कारात ( Awards in India ) साहित्य क्षेत्रातील मानाचा असलेला हा पुरस्कार; एक लाख रुपये (१,०००००-/) रोख व सन्मानचिन्ह या स्वरूपात दिला जातो.

महत्वाचे विजेते :-

1) श्याम मनोहर, 2) विद्यासागर नाजरे, ३) गोविंद मिश्रा, 4) मिथिर सेन मित, 5) प्रमोद कुमार मोहंती, 6) जयंत परमार, 7) सुमन शाह, 8) मिलनमई पेंणु स्वामी. 9) ओम प्रकाश पांडे. या व अशा अनेक लेखकांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

3) ज्ञानपीठ पुरस्कार :-

साहित्य अकादमी प्रमाणेच, भारतीय साहित्य क्षेत्रात दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार (Awards in India )हा सर्वोच्च पुरस्कार आहे. वांग्मयीन क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूची नुसार मान्यताप्राप्त 22 भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत, सर्वोत्तम लिखाण करणारा लेखक, ज्ञानपीठ पुरस्कारास ठरतो पात्र ठरतो. अकरा लाख रुपये (११०००००-/) रोख, वाग्देवीची कांस्यमूर्ती व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच 1965 साली एक लाख रुपयांपासून या पुरस्काराची सुरुवात झाली. 2005 मध्ये बक्षिसाची रक्कम एक लाखावरून 7 लाख रुपये करण्यात आली. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कुंवर नारायण हे 2005 सालच्या पहिल्या सात लाख रुपयाच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले होते. हिंदी आणि कन्नड भाषेतील लेखकांना सर्वाधिक वेळा ज्ञानपीठ पुरस्कार ( Awards in India )मिळालेले आहेत.

काही प्रमुख ज्ञानपीठ विजेते साहित्यिक :-

1) जी शंकर कुरूप, 2) फिराक गोरखपुरी, ३) रामधारी सिंह दिनकर,4) गोपीनाथ महंती, 5) महादेवी वर्मा, 6) बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य, 7) विष्णू वामन शिरवाडकर, 8) गोविंद विनायक करंदीकर. 9) रवींद्र केळकर.

इत्यादी लेखकांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहेत यांच्यासोबतच अनेक साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.

4) दादासाहेब फाळके पुरस्कार :-

भारतीय कला क्षेत्रामध्ये अभिनयाच्या बाबतीत दिला जाणारा दादासाहेब फाळके हा भारतातील ( Awards in India )सर्वोच्च पुरस्कार आहे. चित्रपट कला क्षेत्रामध्ये प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा असेच असते. दादासाहेब फाळके पुरस्कार भारतातील ऑस्कर पुरस्कार समजला जातो.

चित्रमहर्षी, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान केला जातो. दादासाहेब फाळके च्या जन्मशताब्दी वर्षांपासून म्हणजेच इसवी सन 1969 पासून या पुरस्काराची सुरुवात भारत सरकारने केले आहे.
अभिनय क्षेत्रातील अभ्यासक आणि जनकर यांच्या समितीच्या माध्यमातून या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींची निवड केली जाते. दहा लाख रुपये (१०००००-/) रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जुन्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी ही दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेले पहिली अभिनेत्री होती. भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित 51 कलाकार या पुरस्काराने सन्मानित केले आहेत. अभिनेते विनोद खन्ना, आणि अभिनेते राज कपूर यांना मात्र दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर दिला गेला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्काराचे काही महत्त्वाचे मानकरी :-

सविस्तर माहितीसाठी भरात सरकारच्या, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

1) देविका राणी, 2) बीरेंद्र नाथ सरकार, ३) सुलोचना, 4) बी एन रेड्डी, 5) पंकज मलिक, 6) सोहराब मोदी, 7) ऋषिकेश मुखर्जी, 8) यश चोप्रा, 9) आशा भोसले, 10) देवानंद, 11) मनोज कुमार, 12) अमिताभ बच्चन, 13) रजनीकांत.

या व यांच्यासारख्या तब्बल 51 गुणवंत अभिनेत्यांनी आत्तापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवलेला आहे.

5) फिल्मफेअर अवॉर्ड :-

चित्रपट क्षेत्राशी संबंधित, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, गायक, संगीतकार दिग्दर्शक व चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात येते. हिंदी भाषेतील चित्रपट सृष्टीशी संबंधित माहिती, बातम्या, लेख, व चित्रे यांना वाहिलेल्या इंग्रजी भाषेतील फिल्मफेअर या मासिकाद्वारे हा पुरस्कार दिला जातो.

“द टाइम्स ग्रुप” यांच्या अधिपत्याखालील फिल्मफेअर मासिक या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करते. 1954 साली या पुरस्काराची स्थापना केली. आतापर्यंत तब्बल 64 वेळा फिल्मफेअर पुरस्कार वितरित करण्यात आलेले आहेत.

फिल्मफेअर पुरस्कार विजेते काही महत्त्वाचे कलाकार :-

1) रणवीर सिंग, 2) आलिया भट्ट, ३) सिद्धांत चतुर्वेदी, 4) अमृता सुभाष, 5) अनन्या पांडे, 6) अर्जित सिंग, 7) विश्वदीप चटर्जी, 8) विजय मौर्य, 9) शिवकुमार.

इत्यादी व यांच्यासारख्या चित्रपटात संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गुणवंत यांनी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

थोडक्यात :-

भारत सरकारतर्फे दिले जाणारे काही महत्त्वाचे पुरस्कार (Awards in India )आज आपण पाहिले. सरकार तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंतांना आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवता यावा यासाठी; व पुढील पिढ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पारितोषिकांनी सन्मानित केले जाते.

महत्वाच्या माहितीसाठी

येथे क्लिक करा.

आज आपण पाहिलेले, कालिदास सन्मान पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी पुरस्कार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. भारत सरकार वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्म पुरस्कारांची सुद्धा आयोजन करत असते. अनेक क्षेत्रातील नामवंत पद्म पुरस्कारास पात्र ठरतात.

आज आपण कला व साहित्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांची माहिती पाहिली. आणखी कोणकोणत्या पुरस्कार संबंधित माहिती तुम्हाला हवी आहे. हे आम्हाला कॉमेंट द्वारे कळवा, व अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

Leave a Comment

error: Content is protected !!