Apollo11 Moon landing – अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती .

Apollo11 Moon landing – अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती .

Apollo11 Moon landing - अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती .

अमेरिकेची जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अपोलो चंद्र मोहीम; ही मानवाच्या उत्क्रांती, विकास आणि प्रगतीचं सर्वोच्च प्रतीक. माणसाने चंद्रावर पाऊल टाकलं. आणि विज्ञान अशक्य ते शक्य करू शकतो. हे जगाला दाखवून दिलं. अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये अपोलो11 मोहिमेचे यश अतिशय महत्त्वाचं होतं.

पण ही मोहीम एवढी महत्त्वाची का होती? त्यावेळी असं काय घडलं होतं? की या मोहिमेला इतकं महत्व दिलं जातं.; या लेखात Apollo11 Moon landing – अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.  मानवी प्रगतीच्या अतिउच्च टोका विषयी विस्तारित पणे समजून घेऊया.

1957 चा तो काळ. त्याकाळच्या सोव्हिएत संघाच्या शास्त्रज्ञांनी एक स्फुटनिक उपग्रह अवकाशामध्ये सोडला. सोव्हिएत संघाने आपली वैज्ञानिक प्रगती जगाला दाखवून दिली. आणि त्यानंतर सोवियत संघ आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये अंतराळ विषयक स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक जण आपापली वैज्ञानिक ताकद दाखवून देत होता.

1961 च्या काळामध्ये तिच्या राष्ट्राध्यक्षपदी जॉन एफ केनेडी हे विराजमान झाले. परिणामी पूर्ण अमेरिका जगातील देशांनाही असं वाटत होतं कि; अमेरिका त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या व वैज्ञानिक दृष्टीने प्रगतशील असलेल्या देशांसमोर टिकाव धरणार नाही. आणि त्याच वर्षी सोवियेत संघाने, सर्वप्रथम अंतराळ यांना च्या सहाय्याने मानवाला अंतरिक्ष सफर घडवली.

या गोष्टीने अमेरिकेचा मात्र तीळ पापड झाला, आणि अमेरिकेने मानवाला थेट चंद्रावरच  पाठवायचं ठरवलं. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात; म्हणजेच 1962 साल जॉन केनेडी यांनी “आम्ही चंद्रावर जायचं ठरवलं आहे”. अशाप्रकारची घोषणा करून संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

तसं पाहिलं तर सर्वप्रथम सोव्हिएत संघाने सर्वप्रथम अंतराळ यानामध्ये मानवांना अंतराळात पाठवलं; त्याच वेळेस अमेरिका काळजीत पडली होती. आणि अशातच 1965 साली सोव्हिएत संघाने आपले एक अवकाश यान चंद्रावर उतरवलं. परंतु हे यान मानवरहित होते.

अपोलो 11 मोहिमेची तयारी :-Apollo11 Moon landing 

अमेरिकेची जग प्रसिद्ध असलेली अवकाश संशोधन एजन्सी नासाने, अपोलो 11 या मोहिमेसाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी आणि इतर सामग्री पुरवली होती. जवळपास 25 बिलीलियन अमेरिकन डॉलर्स इतका प्रचंड खर्च झाला होता. अमेरिकेने या मोहिमेला पूर्णत्वास नेले होते. याव्यतिरिक्त तब्बल 4 लाख लोकांनी या मोहिमेसाठी मेहनत घेतली होती.

नील आर्मस्ट्राँग, मायकल कॉलिन्स, व सोबतच बझ ऑल्ड्रिन या अनुभवी अंतराळ वीरांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली. चंद्रावर उतरणारं लुनर मोड्यूल आणि अपोलो यानाचे कमांड तसेच सर्विस मोड्यूल “सॅटर्न व्ही” नावाच्या एका शक्तिशाली रॉकेट च्या सहाय्याने अंतरीक्षामध्ये पाठवले होते.

पृथ्वीची कक्षा सोडून अपोलो यान चंद्राच्या कक्षे मध्ये पोहोच करणे हे सॅटर्न व्ही चे उद्दिष्ट होते. अपोलो यान चंद्रावर पोहोचल्यानंतर बझ अल्ड्रिन आणि नीलआर्मस्ट्रॉंग हे दोघेजण लोणार मॉडेल मधून चंद्रावर उतरतील. व सर्विस मॉडेलमध्ये कॉलींस हे कमांड वर असतील. अशा प्रकारचं नियोजन ठरविण्यात आलेलं होतं.

आणखी एका महत्वाच्या

माहितीसाठी येथे क्लिक करा.

 अडचणी :-

नासाच्या बहुचर्चित अपोलो या मोहिमेमध्ये अंतराळयाना द्वारे सर्वप्रथम मनुष्यास पाठवण्याची तयारी सन 1967 मध्ये सर्वप्रथम केली होती. परंतु सराव चाचणी दरम्यान भयंकर दुर्घटना घडली या दुर्घटनेमध्ये कमांड मोड्यूल ला आग लागून 3 अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. परिणामी मानवांना अंतरिक्ष मध्ये घेऊन जाणाऱ्या काही मोहिमा बरेच महिने रद्द केल्या.

एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष अपोलो चंद्र मोहिमेतApollo11 Moon landing चंद्रावरती जात असलेल्या अंतराळवीरांना नासाच्या कंट्रोल रूम सोबत संपर्क करण्यासाठी अडचणींना तोंड द्यावं लागत होतं.

यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर एक इमर्जन्सी आलार्म वाजला. कधीही न ऐकलेल्या या आलार्म मुळे आपण पृथ्वीवर सुरक्षित पोहोचू की नाही याची शक्यता तसेच जिवंत परतण्याची आशा सुद्धा तीनही अंतराळवीरांनी सोडली होती.

त्याचबरोबर चंद्रावर उतरण्यासाठी जी नियोजित जागा ठरवलेली होती, ती जागा अनेक खड्ड्यांची होती. यान उतरवण्यासाठी व्यवस्थित जागा न मिळाल्याने नियोजित जागेपासून दूर अंतरावर लुनार मॉड्यूल उतरवलं गेलं.

चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल :-Apollo11 Moon landing

Apollo11 Moon landing - अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती .

असंख्य अडचणींना तोंड दिल्यानंतर शेवटी तो विजय टप्पा गाठलाच. आणि पृथ्वीपासून एकशे दहा तास प्रवास करून 20 जुलै या दिवशी चंद्रावर पहिलं मानवी पाऊल पडलं. ते पाऊल होतं नील आर्मस्ट्रॉंग यांचे. त्यांच्या पाठोपाठ बझ आल्ड्रिन यांनी चंद्रावर पाय ठेवला. आणि विज्ञानाने एक वेगळाच आयाम पूर्ण केला.

“माणसाचं हे छोटसं पाउलसंपूर्ण मानवजातीसाठी एक गरुड झेप ठरेल”. हे नील आर्मस्ट्रॉंग यांचे शब्द इतिहासात नोंदवले गेले.

दोघेही अंतराळवीर सुमारे दोन ते अडीच तास चंद्राच्या पृष्ठभागावर होते. त्या ठिकाणी त्यांनी काही फोटो काढले, भविष्यातील वैज्ञानिक प्रयोगासाठी लागणाऱ्या काही गोष्टी त्या ठिकाणी स्थापित केल्या चंद्राच्या पृष्ठभागावर चे माती तसेच दगडांचे नमुने गोळा केले.

मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची मोहीम पूर्ण करून तिघे अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत कडे झेपावले. आणि 24 जुलै रोजी हे चंद्र प्रवासी पॅसिफिक महासागरावर यशस्वीरित्या परतले. अपोलो 11  या यानाचे प्रक्षेपण जगभरातून सुमारे साडेसहाशे दशलक्ष लोकांनी पाहिले असावे असा अंदाज बांधला जातो.

 अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल Apollo11 Moon landing  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक होते.

या मोहिमेमुळे संपूर्ण जगाला अमेरिकेची वैज्ञानिक ताकत मान्य करावी लागली. अतिशय धावपळीच्या कालखंडामध्ये देशाचा आत्मसन्मान वाढवणे आणि आपणही जगात कोणा पेक्षाही कमी नाही हे दाखवणे यासाठी वैज्ञानिक ताकत जगासमोर उभी करणं आवश्यक होतं.

दरम्यानच्या काळात राष्ट्राध्यक्ष केनेडी यांची हत्या झाली अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये जातीयवादी दंगली झाल्या. त्याचबरोबर लष्करी कारवाई सुद्धा अमेरिकेमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरली.

NASA नासा च्या

अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी

येथे क्लिक करा.

खरे खोटे देव जाणे :-

जवळपास 1972 पर्यंत अमेरिकेने एकूण सहा मोहिमांच्या माध्यमातून आणि अंतराळवीर चंद्रावर पाठवले होते. परंतु अमेरिकेच्या या चंद्र मोहिमा या बनावट आहेत असं मानणारा सुद्धा एक गट आहे. अमेरिका चंद्रावर गेलीच नाही, केवळ आपलं वर्चस्व जगाला मान्य करायला लावण्यासाठी अमेरिकेने केलेला हा एक बनाव आहे असं अनेक जणांचं म्हणणं आहे.

परंतु नासाने पाठवलेलं एक अंतराळ यान 2009 पासून चंद्राच्या भोवती फिरत आहे. या यानाने चंद्राच्या पृष्ठभूमीवर येईल अनेक फोटो पृथ्वीकडे पाठवले आहेत. या बऱ्याच फोटोंमध्ये अपोलो ११ ही चंद्र मोहीम Apollo11 Moon landing खरी असल्याच्या खाणाखुणा दिसतात.

मानवी पावलांचे ठसे त्याच बरोबर यांच्या टायर चे ठसे सुधा सदरील यानाने पाठवलेल्या फोटो मध्ये दिसत आहेत. एवढच नाही तर अपोलो मोहिमेदरम्यान जमा केलेल्या अनेक नमुन्यातील भौगोलिक पुरावे सुद्धा या यानाला सापडले आहेत.

चंद्रावर का जावे ?

अमेरिका आजही जगातील एकमेव असा देश आहे ज्याने चंद्रावर माणूस पाठवला. त्यानंतर अनेक देशांनी आपापली अंतरिक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवली. परंतु मानवासहित यान मात्र अमेरिकेनेच उतरवलं आहे.

चीन, युरोपियन स्पेस एजन्सी, भारत, रशिया आणि जपान सारख्या अनेक देशांनी अनेक यशस्वी चंद्र मोहिमा केल्या. परंतु चंद्रावर सर्वप्रथम माणूस पाठवणारा जगातील एकमेव देश आज पर्यंत अमेरिका हाच आहे.

चंद्रावर का जावे या प्रश्नाचे उत्तर असं देता येईल, की एखाद्या देशाने मानवासहित इतर ग्रहावर यशस्वी अंतरिक्ष यान उतरवणे हे संबंधित देशाचं तांत्रिक सामर्थ्य जगासमोर आणणे आहे. कठीणात कठीण असलेली गोष्ट सुद्धा आम्ही यशस्वी रित्या साध्य करू शकतो, असंच जणू जगातील इतर देशांना दाखवून दिल्या जातात. यामुळे अशा देशांना जागतिक स्तरावर मान मिळतो.

त्याचबरोबर पृथ्वीवर क्वचित आढळणाऱ्या आणि दुर्मिळ असणाऱ्या अनेक धातूंचा शोध घेण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. चंद्रावर सुद्धा उत्खनन करून सोने, प्लॅटिनम आणि अशाच प्रकारच्या मौल्यवान धातूचा शोध घेता येऊ शकतो. परंतु चंद्रावर उत्खनन करणे हे मोठे आव्हान आहे. आणि हे आव्हान सध्याचं विज्ञान पेलू शकेल की नाही हा आज पर्यंत न सुटलेला प्रश्न आहे.

 अपोलो ११ चंद्र Apollo11 Moon landing मोहिम जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवली गेली हे मात्र ऐतिहासिक सत्य आहे.

Apollo11 Moon landing-अपोलो ११ चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहिती .

थोडक्यात :-

अपोलो 11 या मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या मोहिमेसाठी अनेक अडचणींना तोंड देऊन अमेरिकेने ही मोहीम पूर्ण केली. चंद्रावरील वातावरण, त्या ठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती, तेथील दगड माती या सर्वांविषयी महत्वाची माहिती अमेरिकेने सर्वप्रथम जगाला दिली.

तरीही या मोहिमेमध्ये कमतरता शोधणारे अनेक लोक आहेत. आणि तेही प्रामुख्याने वैज्ञानिकच आहेत. अनेक देशांनी प्रयत्न करूनही आज पर्यंतच्या, इतक्या प्रगत वैज्ञानिक कालखंडात सुद्धा चंद्रावर माणूस पाठवण्यात यश मिळवलं नाही. त्यामुळे आजही चंद्र मोहिमेबाबत सर्वात पुढे अमेरिका हा एकमेव देश आहे.

संपूर्ण जगाला आपलं वैज्ञानिक सामर्थ्य दाखवणाऱ्या अमेरिकेच्या अपोलो ११ या चंद्र मोहिमे बद्द्ल सविस्तर माहितीआपण पाहिली.Apollo11 Moon landing आपणास हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. त्याच बरोबर अशाच महत्वाच्या ऐतिहासिक, वैज्ञानिक, राजकीय तसेच जागतिक नवनवीन घडामोडी माहिती करून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

Leave a Comment

error: Content is protected !!